Thursday, December 4, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘त्या’ बोलेरोतून 1200 लिटर हातभट्टी दारू जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

MH13 News by MH13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र
0
0
SHARES
90
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


बोलेरोतून बाराशे लिटर हातभट्टी दारू जप्त करून एका
विशेष मोहिमेत अकरा गुन्ह्यात साडेनऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी व शनिवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत गुरुवारी सोलापूर- तुळजापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून वाहतूक होणारी बाराशे लिटर हातभट्टी दारूसह जिल्हाभरात हातभट्टी दारू तसेच विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या चार मोटरसायकली जप्त केल्या.



सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात छापा सत्र सुरू करण्यात आले असून राबविलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर- तुळजापूर रोडवरील गंगेवाडी (ता. उत्तर सोलापूर) परिसरात बोलेरो जीप क्रमांक MH 12 GK 4427 या वाहनातून दहा रबरी ट्यूबमध्ये अंदाजे बाराशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करतांना आढळून आल्याने समर्थ मोहन पवार, वय 24 वर्षे व कोंडीबा शिवाजी राठोड, वय 47 वर्षे या दोन इसमांना अटक करण्यात आली.

या कारवाईत बोलेरो वाहनाच्या किमतीसह एकूण सहा लाख 61 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड, वय 24 वर्षे रा. मुळेगाव तांडा हा इसम त्याच्या दुचाकी वाहन क्रमांक MH 13 DH 4313 वरून दोन रबरी ट्यूब मध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत 68 हजार 200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत निरीक्षक जगन्नाथ पाटील यांचे पथकाने मिळालेल्या खात्रीला एक बातमीनुसार सापळा रचून सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक  MH 13 DN 9368 वरून 160 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना गुन्हा दाखल केला,  या कारवाईत आरोपी इसम वाहन जागीच सोडून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

सांगोला दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील मंगळवेढा- मरवडे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायबण्णा सिद्धाराम पाटील, वय 26 वर्षे हा त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH 10 CS 8388 वरून विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या मॅकडॉल नंबर वन च्या 15 बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 24 बाटल्या असा एकूण 66 हजार 570 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पंढरपूर विभागाचे पथकाने माढा तालुक्यातील घोटी परिसरात टेंभुर्णी-पंढरपूर रोडच्या बाजूस एका मोकळ्या जागेत घनश्याम अर्जुन अंकुशराव, वय 40 वर्षे या इसमास रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या बारा बाटल्या व मॅकडॉल रमच्या दहा बाटल्यांसह अटक केली, त्याच्या ताब्यातून तीन हजार सहाशे दहा रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली.

एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथे राहुल नामदेव नवगिरे, वय 32 वर्षे या इसमास त्याच्या होंडा शाईन कंपनीच्या दुचाकी वाहन क्रमांक MH45 Z 8136 वरून एका कापडी पिशवीमध्ये डॉक्टर श्रीपुर ब्रांडी व्हिस्की च्या 180 मिलीच्या 48 सीलबंद बाटल्यांची वाहतूक करताना पकडले, त्याच्या ताब्यातून वाहनासह एकूण 53 हजार 444 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक अकलूज यांच्या पथकाने फोंडशिरस  (ता. माळशिरस) येथे माणिक भिकू रणदिवे, वय 44 वर्षे तुझ्या इसमास 25 लिटर ताडीसह अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाने सोलापूर शहरातील जुना पुना नाका येथे धाड टाकून तौफिक रफिक शेख, वय 33 वर्षे याच्या ताब्यातून 50 लिटर हातभट्टी दारू व गणेश बलभीम अनपट, वय 33 वर्षे याच्या ताब्यातून 54 लिटर फ्रुट बिअर असा मुद्देमाल जप्त केला.

सीमा तपासणी नाक्याच्या  पथकाने कुंभारी परिसरात ज्योत्स्ना विजय मंजुलकर या महिलेच्या ताब्यातून वीस लिटर व अंबादास रामस्वामी बिज्जा याच्या ताब्यातून 22 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण अकरा गुन्ह्यात सोळाशे लिटर हातभट्टी दारू, वीस लिटर विदेशी दारू , 54 लिटर फ्रुट बियर व 25 लिटर ताडीसह एक बोलेरो व चार मोटरसायकली असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.


ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, धनाजी पोवार, बाळू नेवसे, सौरभ भोसले, दत्तात्रय पाटील, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, मानसी वाघ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, गजानन होळकर, आवेज शेख, जीवन मुंढे, मुकेश चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे,  इस्माईल गोडीकट, अशोक माळी, अण्णा कर्चे, नंदकुमार वेळापुरे, विकास वडमिले, तानाजी जाधव,  गजानन जाधव, तानाजी काळे, योगीराज तोग्गी, वाहन चालक रशीद शेख , दीपक वाघमारे, रामचंद्र मदने व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

Tags: Nitin Dharmik
Previous Post

जिजाऊ ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांच्या मातांचा सन्मान

Next Post

कुडलच्या मंदिरास धार्मिक पर्यटन क्षेत्र बनविणार – आ.सुभाष देशमुख

Related Posts

अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा
महाराष्ट्र

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा

24 November 2025
लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र

लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५

18 November 2025
Next Post

कुडलच्या मंदिरास धार्मिक पर्यटन क्षेत्र बनविणार - आ.सुभाष देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.