MH 13 NEWS NETWORK
आमदार देशमुख यांनी केले कौतूक
सोलापूर / तालुका प्रतिनिधी– भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी महाअभियान 2025 संपूर्ण राज्यभरात उत्साहात सुरू आहे.याच अनुषंगाने,संघटन पर्व कार्यशाळा आणि सक्रिय सदस्य नोंदणी अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर येथील किल्लेदार मंगल कार्यालयात शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ प्रमुखांची बैठक सुभाष बापू देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी आमदार देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा सत्कार करुन पक्ष वाढवण्याचा सल्ला दिला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली,तसेच,1000 सदस्य नोंदणी पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. पक्षवाढीच्या या ऐतिहासिक उपक्रमात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यातून पक्षाच्या संघटनबांधणीची ताकद अधोरेखित होत आहे, असे आमदार देशमुख म्हणाले.
या बैठकीस हणमंत कुलकर्णी, राम जाधव,. चनगोंडा हाविनाळे, रामप्पा चिवडशेट्टी, मनीष देशमुख, शिवराज सरतापे, विशाल गायकवाड, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख,बूथ प्रमुख तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.