हेरिटेज दर्जाच्या वास्तु परिसरात उत्खनन करून बेकायदेशीर शौचालय उभारणीला नवी पेठ परिसरातील व्यापाऱ्यांचा विरोध
पालिका आयुक्तांनी ऐतिहासिक हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूच्या सौंदर्याची जतन करावी अन्यथा जनआंदोलन :-मा. सभागृह नेते सुरेश पाटील
नवी पेठ परिसरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत वातानुकूलित सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे. सध्या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधकाम बेकायदेशीर सुरू झाले आहे. दरम्यान, सोमवारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी येथील स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत या परिसरात भेट देऊन या बेकायदेशीर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली.
या बांधकामास येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून मूळ इमारतीचे सौंदर्य यामुळे जाणार आहे. या इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावे. ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे या बेकायदेशीर शौचालया मुळे या वास्तूची प्रतिमा मलीन होईल याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी शहरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून भारतीय पुरातन विभागाची परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचं आहे.
असे होताना दिसत नाही परंतु या वास्तूला मोठी ऐतिहासिक वारसा आहे. मार्शल लॉ च्या काळात या वास्तूवर शेठ माणिकचंद शहा या नगराध्यक्षांनी तिरंगा ध्वज फडकवला होता त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना अटक केली होती अशी ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणे हे चुकीचे होणार आहे संबंधित बांधकाम त्वरित थांबवा अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी यावेळी दिला.
पालिका आयुक्तांनी सोलापूर शहरातील दुरावस्थेत पडलेल्या शौचालयाची पाहणी करावी त्या शौचालयाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात मोठी दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही समस्या प्रथमता पालिका आयुक्तांनी दूर करावे. नवी पेठ परिसरात अनेक शॉपिंग सेंटर आहेत या परिसरात असणाऱ्या शॉपिंग सेंटर मधील सार्वजनिक शौचालय सर्व सोयी नियुक्त करा परंतु असे होताना दिसत नाही. नवी पेठ परिसरातील सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात हेरिटेजची वास्तू परिसरात असे सार्वजनिक शौचालय बांधकाम योग्य होणार नाही. यामुळे या वास्तूची सौंदर्य निघून जाईल याची खबरदारी घ्यावी. हेरिटेज दर्जा असणाऱ्या या वास्तूला मोठे ऐतिहासिक वारसा आहे हे वारसा जतन करावे. नुकतेच सोलापूर महानगरपालिकेतील इंद्रभवन या वास्तूची नव्याने नूतनीकरण करण्यात आले सदरची वास्तू पाहण्यासाठी अनेक पर्यटक व ऐतिहासिक प्रेमी भेट देत असतात याच धर्तीवर नवी पेठ परिसरातील मनपा शिक्षण मंडळाच्या वास्तूची पालिका आयुक्तांनी नूतनीकरण करून या वास्तूची ऐतिहासिक परंपरा जपावी अशी मागणी येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी यावेळी केली.
सोलापूर शहरातील अनेक असे हेरिटेज वास्तू आहेत याची माहिती पालिका आयुक्तांना आहे का याचा विसर त्यांना पडला आहे का असा सवाल देखील उपस्थित होत आहे ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वस्तूंची जतन करणे हे काळाची गरज आहे असेही यावेळी सुरेश पाटील म्हणाले.
भारतीय पुरातन विभागाच्या परवानग्या आपण कायदेशीर घेतल्या आहेत का कुठलेही बांधकाम, पाडकाम आणि खोदकाम करत असताना आवश्यक त्या कागदपत्र परवाना आहेत का असे देखील ते म्हणाले. पालिका आयुक्तांनी या परिसरात सुरू असलेले बेकायदेशीर सौचालय त्वरित बंद करावी अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी सुरेश पाटलांनी दिला. विजय भोईटे, राजू पवार, मनोहर दासरी, अविनाश दासरी, विठ्ठल पवार, विजय गोरटे, सचिन पवार, इस्ताक शेख इरालाल साखराने यांच्यासह नवी पेठ परिसरातील व्यापारी यावेळी उपस्थित होते. त्वरित सदरचा शौचालयाचे बांधकाम पालिका आयुक्तांनी थांबवावे अशी प्रतिक्रिया देखील यावेळी उपस्थित व्यापाऱ्याने दिली.