Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

क्रीडा संकुलाची सर्व कामे मंजूर निधीतून वेळेत पूर्ण करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
क्रीडा संकुलाची सर्व कामे मंजूर निधीतून वेळेत पूर्ण करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

क्रीडा संकुल अंतर्गत कामासाठी १५ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर; तालुका क्रिडा संकुलाची कामेही वेळेत पूर्ण करावी

सोलापूर, दि. २१ :  जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी 15 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. क्रीडा विभागाने संबंधित खेळाडूंना चांगल्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी संबंधित कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हासतरीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या सर्व संबंधित सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की,  कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, खेळाडूंसाठी हॉस्टेल, बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आदी सर्व कामे मंजूर निधीतून पूर्ण करावी. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी. क्रीडा संकुलात सर्व खेळाडू खेळाशी संबंधित संस्था व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजेत. यासाठी आवश्यक असलेला निधीची तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका स्तरपर्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी क्रीडा विभागाने तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांची कामे अधिक गतीने मार्गी लावावीत. शासनाने तालुकास्तरावरील चांगली क्रीडा संकुले उभे राहावीत यासाठी निधी मंजूर केलेला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा निर्माण झाल्यास ते राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्वल करतील असे त्यांनी सांगितले. विहित पद्धतीने खेळाशी संबंधित संस्थांना शासकीय मैदाने उपलब्ध करून द्यावीत. अन्य कोणत्याही खाजगी कारणासाठी मैदाने उपलब्ध करू नयेत असेही त्यांनी सुचित केले. महापालिकेकडे असलेला क्रीडा विभागाचा जलतरण तलाव हस्तांतरित करण्याबाबत महापालिका आयुक्त आल्यानंतर चर्चा करून निर्णय घ्यावा. तसेच क्रीडा संकुल अंतर्गत रिक्त असलेले शासकीय गाळे विहित नियमावलीचा वापर करून भाड्याने द्यावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुलामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून मिळण्याबाबत क्रीडा विभागाने अधिक सक्षमपणे काम करावे असे सांगितले.

प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी जिल्हास्तरीय क्रीडा संकुल अंतर्गत असलेल्या विविध विषयांची माहिती बैठकीत सादर केली. कुमठा नाका येथल जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी 15 कोटी 69 लाखाचा निधी मंजूर असून यातील आठ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत ते अंतर्गत सर्व कामे व्यवस्थितपणे वेळेत पूर्ण करून घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले. तसेच क्रीडा संकुल समितीने सुस्थितीत दिलेला जलतरण तलाव महापालिकेने सुस्थितीमध्येच  संकुल समितीला परत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Previous Post

येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

खरीप पिकांसाठी किमान हमी भावात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
खरीप पिकांसाठी किमान हमी भावात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

खरीप पिकांसाठी किमान हमी भावात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.