MH 13News Network
अनंत जाधव हा नातं जपणारा नेता : आमदार विजयकुमार देशमुख
भाजपने वचनपूर्ती केल्याने लाडक्या बहिणींनी नेत्यांना बांधल्या राख्या, एक कोटींच्या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ
सोलापूर : प्रतिनिधी
माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या प्रयत्नातून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून मराठा वस्ती अंतर्गत ड्रेनेज पाईप लाईन टाकण्याच्या एक कोटी कामाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ कसबे, राजकुमार पाटील आणि माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी भाजपच्या वचनपूर्ती आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना रक्षाबंधन निमित्त मराठा वस्ती येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ज्येष्ठ महिलांच्या हस्ते राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक भाषणात भाजप उपाध्यक्ष आनंत जाधव यांनी शासनाच्या योजनेची माहिती देत भाजपने वचनपूर्ती केली असून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत जोपर्यंत शेवटच्या बहिणीपर्यंत पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करू असे म्हणत मराठा वस्तीतील विकास कामांसाठी आणखी एक कोटी रुपयांची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांनी रक्षाबंधन पूर्वीच महाराष्ट्रातील बहिणींना ओवाळण्याची भेट दिली आहे. लाडक्या बहिणींनी आगामी काळात आपल्या भावाच्या पाठीशी आशीर्वादरूपी उभे राहावे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.
मराठा वस्ती भागातील महिला आपल्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी आनंत जाधव नेहमी प्रयत्न करतात. लाडकी बहीण योजना अंमलात आणताना काँग्रेसने विरोध केला परंतु महायुती सरकारने प्रत्येक बहिणीच्या खात्यावर पैसे पाठवून वचनपूर्ती केल्याचे मत भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद होणार नसून अविरत सुरू राहणार आहे. विरोधक त्याचा खोटा प्रचार प्रसार करत आहेत विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नये. आनंत जाधव हा नाते जपणारा नेता असून या भागातील नागरी नागरिकांच्या समस्या वेळोवेळी सोडवतात. मराठा वस्तीतील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
रक्षाबंधन निमित्त शेकडो बहिणींनी अनंत जाधव यांना राख्या बांधल्या जाधव यांनी सर्व बहिणींना भेट म्हणून टिफिन बॉक्स देण्यात आले आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन साळुंखे, दशरथ भोसले, दिनेश फुटाणे, माऊली माने, युवराज सुरवसे, सचिन बुरांडे, बंटी हिंगमिरे, शुभम हुछे, रमेश रोहिटे, आकाश शिरसाट, प्रकाश ताकभाते, गणेश शिंदे यांच्यासह अनंत जाधव मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.