MH 13News Network
वसंत कॅपची 100 वर्षाची परंपरा असलेल्या डोईजोडे परिवाराने जुळे सोलापूर मध्ये अश्विन्स वसंत फर्निशींग्स या नव्या अद्ययावत शोरूमचा शुभारंभ रविवारी मातोश्री सौ.पुष्पा आणि पिताश्री अशोक डोईजोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल ते शिवदारे कॉलेज रस्त्यावरील आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर अश्विन्स वसंत फर्निशींग्स या अत्याधुनिक, वातानुकुलित अशा शोरूमचा शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडिमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंडस, रोलर ब्लाईंडस, झेब्रा ब्लाईंडस,ब्लॅक आऊट ब्लाईंडस, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, नामवंत कंपन्याचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या, कारपेट अशा वस्तु उपलब्ध करण्यात आलेले आहेत. डि डेकोर, केबी डिकोर, एस एन डिकोर, हरित अशा प्रसिध्द कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किंमतीपासून उपलब्ध करण्यात आले आहे. या शोरूमचे उदघाटन करून ग्राहकांसाठी घर सजवण्यासाठी लागणारे विविध पडद्यांचे कापड आणि कुशनचे साहित्य जुळे सोलापूर मध्ये अश्विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
अत्यंत देखण्या उदघाटन समारंभाला शहर परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. या उदघाटनप्रसंगी नारायण डोईजोडे, सुहास डोईजोडे, सुषमा डोईजोडे, अथर्व डोईजोडे, सुर्यकांत डोईजोडे, अमोल डोईजोडे, अजय डोईजोडे, वसंतराव डोईजोडे, आण्णाराव डोईजोडे, रमेश डोईजोडे, उत्तम डोईजोडे, चंद्रकांत डोईजोडे आदी उपस्थित होते.