MH 13News Network
वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीने अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता
ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
सोलापूर : प्रतिनिधी
वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीने रविवारी सात दिवस चाललेल्या अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता भक्तीमय वातावरणात झाली. श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठात रविवारी धार्मिक कार्यक्रम झाले.
रविवारी सकाळी मंगलमंत्र पठण, स्थापित देवता पूजा अभिषेक, लघुन्यास पठण झाल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अतिरुद्र स्वाहाकार सांगता झाली. यानंतर साधुसंतांचा तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष प. पू. ह. भ. प. श्री. अक्षय महाराज भोसले, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. श्री. सुधाकर महाराज इंगळे, प्रधान आचार्य पं. गोविंदशास्त्री जोशी, सिद्धारूढ मठाच्या श्रो. ब्र. श्री. सुशांता देवी, प. पू. श्रो. ब्र. श्री. जडेसिद्धेश्वर महास्वामीजी, शुभराय मठाच्या प. पू. शुभांगी माई बुवा, अखिल भारत पुरोहित संघमचे अध्यक्ष प. पू. श्री. वेणुगोपाल जिल्ला पंतलु, मठाचे संस्थापक प. पू. श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी, मठाधिपती प. पू. श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, मुख्य यजमान ब्रिजमोहन फोफलिया, अदौनीचे आमदार गुमनुरू जयराम, पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटीचे अधिकारी धानेश स्वामी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमल, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेना शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी कृष्णात पाटील, महाराष्ट्र गृहनिर्माणचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. विश्वनाथ पाटील, ॲड. संतोष होसमनी, उद्योजक संतोष पाटील, रंजिता चाकोते, रामचंद्र गुरव, योगेश कुलकर्णी, स्वागत अध्यक्ष विशाल बन्सल, स्वागत उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांना श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. रुद्रयंत्र, रुद्राक्ष माळ, शाल, पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.
ह. भ. प. अक्षय महाराज भोसले म्हणाले, साधुसंत सर्वसामान्य दिसतात. परंतु त्यांचा अध्यात्मिक अभ्यास प्रचंड मोठा असतो. ज्याप्रमाणे परिसामुळे लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे संतांमुळे भक्तांचे कल्याण होते. संतांकडे ज्ञानाचा सागर असूनही त्यांच्यामध्ये मोठी विनम्रता असते. ही विनम्रता अध्यात्मामुळे येते. श्री श्री सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आमंत्रित करण्यात येणार आहे, असेही ह. भ. प. अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले. यावेळी मनिषकुमार फोफलिया आणि अमृता फोफलिया यांच्या हस्ते श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांची पाद्यपूजा करण्यात आली.
मुंबई येथील उद्योजक सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नागेश साळुंखे आणि गिरीश गोसकी यांनी सूत्रसंचालन केले.
ह. भ. प. गहिनीनाथ औसेकर महाराजांनी भ्रमणध्वनीवरून साधला संवाद
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ औसेकर महाराज अतिरुद्र कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना येणे शक्य नसल्याने त्यांनी भाविकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आशीर्वाचन केले.