Monday, September 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

फसवणूक प्रकरणी बिशी चालकास जामीन मंजूर

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, सोलापूर शहर
0
फसवणूक प्रकरणी बिशी चालकास जामीन मंजूर
0
SHARES
122
VIEWS
ShareShareShare

mh 13 network

सोलापूर-पूर्व भागातील 2७६ लोकांनी आठवडा बिशीपोटी भरलेली रक्कम रु 1 कोटी 78 लाख परत न दिल्याने फसवणूकीचा गुन्हा नोंद असलेल्या बिशी चालक अशोक रामय्या कैरमकोंडा वय-७८,रा.सोलापूर यांचा जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.योगेश राणे यांनी मंजूर केला.

      यात हकिकत अशी की, फिर्यादी हा सुमारे ४० वर्षापासून अशोक रामय्या कैरमकोंडा, अरविंद अशोक कैरमकोंडा, सुजाता अरविंद कैरमकोंडा यांच्याकडे बिशी म्हणून भरलेले पैसे घेवून त्यांनी फिर्यादीकडे दिलेल्या डायरीमध्ये नोंद करून त्यावर स्वतःची सही करून देत होते. तसेच नमूद बिशी चालकाकडे फिर्यादी बिशी स्वरूपात एकूण भरलेली रक्कम हि बिशी संपल्यानंतर मुळ जमा रक्कम व त्यावर त्यांनी १ टक्के रक्कम जादा स्वरूपात देत होते. अशा पद्धतीने वरील नमूद बिशी चालक यांनी चांगल्या प्रकारे बिशी चालवत होते परंतु कोविड १९ पासून आरोपींना घरगूती व आथिर्क अडचणी मुळे फिर्यादी व साक्षीदारांना कडून सन २०१९ २०२० २०२१ व २०२२ पर्यतची जमा करू घेतलेली रोख रक्कम १२,४५०००/रु मुददल रक्कम व त्यावरील १ टक्का रक्कम वरील लोकांनी देणे असल्यामुळे वेळोवेळी त्यांचे घरी जावुन मागणी करीत असताना वरील लोकांनी आज आज देतो, उदया देतो, आमचे घर विकले आहे ते पैसे आमच्याकडे आल्यावर आम्ही तुमची संपुर्ण रक्कम देतो, असे म्हणुन विश्वास संपादन करुन वरील लोकांनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरवात केली.  अधुनमधुनआर्थिक अडचणीमुळे वरील नमुद बिशी चालकाकडे जावुन वेळोवेळी रक्कम मागणी केली असता,  अचानकपणे यातील अशोक रामय्या कैरमकोंडा दि ०७.११.२०२२ रोजी त्यांचे राहते घरातून निघुन गेला असताना देखील त्यांचा मुलगा व सुन यांनी सदर बाबत दि ०२.०११.२०२२ रोजी व दै. लोकमत व दिव्य मराठी या वर्तमानपत्रात अँड एस ओ उंबरजे तसेच अँड श्रीकांत कोठा यांचे मार्फतीने जाहीर नोटीस दिल्याने सदरची जाहीर नोटीस पेपरमध्ये वाचल्यानंतर फसवणुक झाल्याची खात्री झाल्याने वरील बिशी चालक यांच्या विरूद्ध सोलापुर शहरातील सुमारे २७६ लोकांना वरील सर्व बिशी चालक यांनी रक्कम रु 1 कोटी 78 लाख जमा करुन घेवुन ते पैसे सभासद यांना परत न देता फसवणुक केली आहे अशा आशयाची फिर्याद  जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दाखल केली होती.
  यामध्ये अशोक कैरमकोंडा यास पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने जामीन मिळण्याकरिता  अँड. संतोष न्हावकर यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
 यात आरोपीतर्फे युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी आरोपी हा मागील 40 वर्षांपासून बिशी चालवीत असल्याने व इतकी वर्षे तो सर्वांना व्याजासह रक्कम परत देत आलेला असल्याने त्याचा उद्देश फसवणुकीचा आहे असे म्हणता येणार नाही असे मे.कोर्टाचे निदर्शनास आणून दिले.तसेच त्या पुष्ठर्थ मे.सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
    यात आरोपी तर्फे अँड संतोष न्हावकर ,अँड वैष्णवी न्हावकर, अँड.राहुल रुपनर, अँड चैतन्य नल्ला यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले.
Previous Post

पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची विधानभवनाला भेट

Next Post

माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २० ते २५ मार्च २०२५ दरम्यान विशेष प्रदर्शन

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post
माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २० ते २५ मार्च २०२५ दरम्यान विशेष प्रदर्शन

माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २० ते २५ मार्च २०२५ दरम्यान विशेष प्रदर्शन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.