MH 13 News Network
मराठा वस्तीतील पाणी प्रश्न हा बिकट बनला आहे. कमी दाबाने येणारे पिण्याचे पाणी येथील नागरिकांची मूळ समस्या होती. त्यातच दूषित,दुर्गंधीयुक्त काळे पाणी सर्वसामान्य नागरिकांना प्यावे लागत आहे. हा पाणी प्रश्न सुटण्यासाठी भाजपच्या नेत्याला पालकमंत्री, आमदार आणि भाजप अध्यक्षांची साथ मिळाली आहे.
माजी नगरसेवक तथा भाजप नेते अनंत जाधव यांनी मराठा वस्तीतील पाणी समस्येबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे खरी परिस्थिती मांडली. यावेळी अभ्यासू अध्यक्ष अशी प्रतिमा असणारे नरेंद्र काळे हे समवेत होते.
पाणी समस्या सोडवण्याच्या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये अनुदान तरतूद करुन माजी नगरसेवक जाधव यांची मागणी मान्य करण्यात आली आहे.
मराठा वस्तीतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे, उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ सचिन ओबासे, उपायुक्त संदीप कारंजे, पाणीपुरवठा अधिकारी डंके यांची मदत झाली असून त्यांचे आभार माजी नगरसेवक तथा भाजप नेते अनंत जाधव यांनी मानले.
एक हक्काचा भाऊ म्हणून ही माझी जबाबदारीच..!
मनपा आयुक्तांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत सन २०२५- २६ या आर्थिक वर्षाकरिता माझ्या मतदारसंघातील ७२ लाखांच्या विकास कामास प्रशासकीय मंजूरी मिळणेबाबत प्रस्ताव सादर केलेला होता.त्या कामास मान्यता मिळालेली आहे.
मराठा वस्तीसह प्रभाग क्रमांक चार मधील समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचा भाऊ या नात्याने माझी जबाबदारी होती. ती पूर्ण करण्यात यश आले आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नवीन मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि त्यात माझ्या पक्षातील वरिष्ठांमुळे यश मिळाले आहे.
श्री.अनंत जाधव, माजी नगरसेवक