Tuesday, November 4, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

गॅस दरवाढ | रस्त्यावर पेटवल्या चूल,थापल्या भाकऱ्या ; सोलापुरातील आंदोलन..

MH 13 News by MH 13 News
7 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
गॅस दरवाढ | रस्त्यावर पेटवल्या चूल,थापल्या भाकऱ्या ; सोलापुरातील आंदोलन..
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

भाजप महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेतून दिलेले पैसे गॅस सिलेंडर दरवाढ करून लाडक्या बहिणींनीकडूनच वसूल करत आहेत : चेतन भाऊ नरोटे

गॅस दरवाढ विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन, चूल पेटवून भाकऱ्या थापल्या.

गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ, अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेनाशा झाल्या आहेत. यास जबाबदार केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे दरवाढ विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना महिलांनी चूल पेटवून भाकरी थापल्या. आणि निदर्शने आंदोलन करून दरवाढ करणाऱ्या भाजप, महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका – लाडक्या बहिणींना फटका, महागाईचा झटका – लाडक्या बहिणींना फटका, गॅस का भडका –
गरीब पे धडका, मोदी सरकारची गोष्टच न्यारी – चूल फुंकण्याची वेळ आणली भारी, गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा यासारख्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे म्हणाले की, अख्ख्या जगात गॅस, पेट्रोल डिझेल स्वस्त होतय पण भारतात मात्र मोदी सरकार गॅस , पेट्रोल , डिझेल, गॅस च्या किमतीत वाढ करून जनतेची लूट सुरू केली आहे. लाडकी बहिण योजनेतून दिलेले पैसे वसुली लाडक्या बहिणीकडून वसूल करण्याच्या धंदा भाजप सरकारने सुरू केला आहे.
कच्चे तेल एप्रिल २०२४ ला ८४ डॉलर प्रति बॅरल होते एका वर्षात म्हणजे एप्रिल २०२५ मध्ये ६० डॉलर प्रति बॅरल इतके दर कमी झाले आहे. कच्चे तेल पहिल्यांदाच सर्वात स्वस्त झाले आहे. पण देशात मात्र भाजप सरकार दर वाढवत आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना १५० डॉलर प्रति बॅरल दर असताना ७० रुपये पेट्रोल आणि ३५० रुपये गॅस सिलेंडरचे दर होते. या इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, गृहिणी या सगळ्यांच्या खिशाला यातून चटका बसत आहे. महागाईचा भडका होत असताना सरकारला सामान्य माणसाचा विचार करायला वेळच नाही. देशातील जनतेला वक्फबिल, औरंगजेब, हिंदू मुस्लिम या सगळ्या भानगडीत गुंतवून मोदी साहेबांनी दरवाढीचा मोठ्ठा मास्टर स्ट्रोक मारला आहे. जनतेची लूट हाच सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. महागाई थेट स्वयंपाकघरात घुसली असून महिलांचे बजेट कोलमडले आहे. पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची आणली आहे. सामान्य लोक हे फक्त कर भरण्यासाठीच उरले आहेत का ? केंद्रातील नरेंद्र च्या थापा आणि राज्यातील देवेंद्र च्या गप्पा हे दोघे सर्वसामान्य जनतेला महागाईने रडवत आहेत. जनतेचे हाल करत आहेत. म्हणून सरकारने तात्काळ सर्वसामान्यांचा विचार करून गॅस, पेट्रोल, डिझेल चे दरवाढ मागे घ्यावी.

या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, मा. नगरसेवक दत्तू बंदपट्टे, हारून शेख, भोजराज पवार, मा. नगरसेविका परवीण इनामदार, जुबेर कुरेशी, भीमाशंकर टेकाळे, शकील मौलवी, राहुल वर्धा, युवराज जाधव, वाहिद बिजापूरे, नजीब शेख, विश्वनाथ साबळे, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, बाबुराव म्हेत्रे, अशोक कलशेट्टी, अँड केशव इंगळे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, अनिल मस्के, सागर उबाळे, संजय गायकवाड, सुबोध सुतकर, रुपेश गायकवाड, विवेक कन्ना, शिवशंकर अंजनाळकर, गिरिधर थोरात, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, वशिष्ठ सोनकांबळे, तौसिफ शेख, अप्पू शेख, भीमराव शिंदे, धीरज खंदारे, सुभाष वाघमारे, शिवाजी साळुंखे, शुभांगी लिंगराज, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, मुमताज शेख, करिमुनिसा बागवान, चंदा काळे, वराह अतनुरे, दशरथ सामल, श्याम केंगार, शिवाजी साळुंखे, अमीर शेख, बालाजी जाधव, अनिता भालेराव, छाया हिरवटे, संदेशा गायकवाड, सानीया पठाण, धैर्यशील बाबरे, बन्नप्पा कंपली, रफिक रामपूरे, रेहान शेख, दत्तात्रय पवार, जिलानी मुजावर, महिबुब शेख, सुमन काळे, कामाक्षी जाधव, सुनील डोळसे, शकुर शेख, जब्बार शेख, मार्था रावडे, सुजाता भंडारे, श्रीकांत साखरे, अभिलाष अच्युगटला, अमजद शेख, महेश धोत्रेकर, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गायक मोहम्मद अयाज यांच्या ईद मिलन कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती

Next Post

जया’भाऊ’, मालकांची साथ ; भाजप ‘नेता’ची पाणी प्रश्नावर मात..!

Related Posts

सोलापूर बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार..! सरन्यायाधीश म्हणाले..!
महाराष्ट्र

सोलापूर बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार..! सरन्यायाधीश म्हणाले..!

2 November 2025
🌿 शहरात जंगल!राज्यात सुरू होतोय ‘अर्बन फॉरेस्ट’ मिशन.. प्रत्येक शहर हरित.!– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कृषी

🌿 शहरात जंगल!राज्यात सुरू होतोय ‘अर्बन फॉरेस्ट’ मिशन.. प्रत्येक शहर हरित.!– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 November 2025
संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धार्मिक

संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 November 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! ‘वालेगावकर’ मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..
धार्मिक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! ‘वालेगावकर’ मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..

2 November 2025
ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता
गुन्हेगारी जगात

ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

1 November 2025
Solapur |अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता
सामाजिक

Solapur |अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

1 November 2025
Next Post
जया’भाऊ’, मालकांची साथ ; भाजप ‘नेता’ची पाणी प्रश्नावर मात..!

जया'भाऊ', मालकांची साथ ; भाजप 'नेता'ची पाणी प्रश्नावर मात..!

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.