MH13NEWS network
सोलापूर शहरातील विजयपूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलावात) आज सकाळी एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे.याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो मृतदेह पाण्यातून बाजूला काढला आहे




सदरचा युवक हा 44 वर्षाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
सुभाष मारुती कांबळे वय वर्ष 44 असे या इसमाचे नाव आहे. हा युवक लष्कर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. आज 3 जून वार मंगळवार रोजी सकाळी साधारण नऊ वाजता सुभाष यांचा मृतदेह तलावात तरंगत असल्याचे दिसून आले. सदर घटनेची माहिती सदर बझार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह हा पाण्याबाहेर काढून शव विच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल ) या ठिकाणी पाठवण्यात आला.

शहर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
Solapur Municipal Corporation, Solapur
Solapur City Police