MH 13News Network
पञातालिम परिसरात आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास स्थानिक रहिवासी राजू यलशेट्टी यांच्या घरातील पाळीव मांजर अचानक परिसरात असलेल्या अशोकाच्या झाडावर जाऊन बसले.अशोकाच्या झाङाच्या सर्वांत उंच टोकाला हे मांजर अङकल्याने त्या मांजराला खाली उतरवणे कठीण होते.झाङात अङकल्याने मांजर घाबरुन गेले होते.त्यामुळे ते जोर-जोरात ओरङत होते.या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी अग्निशामक दलाच्या विभागाला कळविली.घटनेची माहिती कळताच तात्काळ अग्निशामक दलाची गाङीही पञातालमित दाखल झाली.
अग्निशामक दलाची गाङी आल्यानंतर व झाङावर अङकलेल्या मांजराला पाहण्यासाठी स्थानिक परिसरातील लोकांची गर्दी वाढू लागली.अग्निशामक दलाच्या कर्तव्यदक्षतेमुळे अग्निशामक दल विभाग जवानांच्या अथक प्रयत्नानंतर मांजराची सुटका झाली.आणि पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घङले.
अग्निशामक दलाच्या जवान श्रीकांत भङके,संजय जगताप ,विश्वनाथ काबणे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे राष्ट्रवादी सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे व पञातालिम परिसरातील स्थानिक रहिवाशांनी आभार प्रकट केले.
सोलापूरकरांना आवाहन करण्यात येते की पाळीव प्राण्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी.व असे व ईतर काही प्रसंग आपल्या प्रभागात घङत असतील तर संबंधित तात्काळ अग्निशामक दलाच्या विभागास माहिती कळवावी असे आवाहन अग्निशामक दल विभागाचे प्रमुख केदार आवटे यांनी केले आहे.