सिंधुदुर्गनगर ): प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार दि. 17 एप्रिल 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाच होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
काय करावे
1) परेसे पाणी प्या तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
2) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
3) दुपारी बारा ते तीन दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा.
4) सुर्यप्राकशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
5) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
6) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
7) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
8) उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके,मान,चेहरा झाकण्यात यावा.
9) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
10) अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत
व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
11) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
12) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या
ठेवण्यात याव्यात.
13) पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
14) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
15) सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.
16) पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये
मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
17) गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
काय करु नये
1) उन्हात अति कष्टाची कामे करु नका.
2) दारु,चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
3) दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
4) उच्च प्रथिनयुक्त आणि शिळेअन्न खाऊ नका.
5) लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
6) गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
7) बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
8) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.
Hi! Do you know if they make any plugins to help with SEO?
I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
If you know of any please share. Thank you! You
can read similar text here: Eco blankets