Friday, November 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ व ‘अन्नपूर्णा योजना’ या सर्वसामान्य महिलांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. शासन राज्याच्या विकासाला प्राधान्य देत असतानाच कल्याणकारी योजनाही राबवित असून यातून विकास व कल्याण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

इंडिया टुडे ग्रुपच्या ‘मुंबई तक बैठक’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुंबई तकच्या अँकर हर्षदा परब, अनुजा धाक्रस आणि माधवी देसाई यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची आज मुलाखत घेतली.

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे शासन आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना, अन्नपूर्णा योजना याबरोबरच वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र योजना अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेची तयारी ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सुरू होती. घरातील महिलांना घरखर्च करताना कसरत करावी लागते. त्यांना आधार देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून राज्य शासन करत आहोत. ही योजना सध्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. ‘लेक लाडकी लखपती योजना’ तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क माफी अशा योजनेतून महिलांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. या कल्याणकारी योजनांसाठी निधीची तरतूद करूनच त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

महाराष्ट्र हे राज्य प्रगतीशील राज्य असून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होत असून रोजगार संधी निर्माण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. राज्य शासन करत असलेली सकारात्मक कामे, योजना ही माध्यमांनी आपल्या व्यासपीठावरून लोकांपर्यंत पोहोचवावीत. लोकांच्या हिताची कामे दाखवावेत. वस्तुनिष्ठ माहिती पोचवावी. लोकांच्या समस्यांना वाचा फोडणारी पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Previous Post

अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांच्या हस्ते २ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण

Next Post

सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्या’तून लाभ द्यावा

Related Posts

परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली जखमींची भेट; LNJP रुग्णालयात तब्येतीची विचारपूस
महाराष्ट्र

परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली जखमींची भेट; LNJP रुग्णालयात तब्येतीची विचारपूस

14 November 2025
प्राजक्ता–हिमांशू विवाह समारंभ भव्यदिव्य; मान्यवरांची विशेष उपस्थिती
महाराष्ट्र

प्राजक्ता–हिमांशू विवाह समारंभ भव्यदिव्य; मान्यवरांची विशेष उपस्थिती

14 November 2025
कौटुंबिक वादातून सोलापुरातील युवा वकिलाची आत्महत्या; बनियनमध्ये सापडली ‘सुसाईड नोट’!
महाराष्ट्र

कौटुंबिक वादातून सोलापुरातील युवा वकिलाची आत्महत्या; बनियनमध्ये सापडली ‘सुसाईड नोट’!

14 November 2025
सोलापूरच्या बालाजी अमाईन्सला रोटरी इंडियाचा ‘बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड’
महाराष्ट्र

सोलापूरच्या बालाजी अमाईन्सला रोटरी इंडियाचा ‘बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड’

14 November 2025
भरधाव कारची आयशर टेम्पोला जोरदार धडक; दोघांची प्रकृती गंभीर
महाराष्ट्र

भरधाव कारची आयशर टेम्पोला जोरदार धडक; दोघांची प्रकृती गंभीर

14 November 2025
लोकमंगलचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येत्या रविवारी पार पडणार
महाराष्ट्र

लोकमंगलचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येत्या रविवारी पार पडणार

14 November 2025
Next Post
सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्या’तून लाभ द्यावा

सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्या’तून लाभ द्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.