सोलापूर, दि. १४ ऑक्टोबर — महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी १.२० वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार असून, तत्पूर्वी ते मुंबई–सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ करणार आहेत. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.

यानंतर मुख्यमंत्री २.२५ वाजता हेलिकॉप्टरने बोरगाव (ता. माळशिरस) येथे आगमन करतील. त्यानंतर ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूर येथे जातील. येथे मुख्यमंत्री कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण व पोटॅश प्रकल्पाचा शुभारंभ करतील

.हा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री सायंकाळी ४.२५ वाजता हेलिकॉप्टरने बारामती (जि. पुणे) येथे रवाना होतील. त्यानंतर ते मुंबईकडे प्रयाण करून सायं. ५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील.

Devendra Fadnavis CMOMaharashtra Kothe Devendra Rajesh Jaykumar Gore BJP Maharashtra