Wednesday, July 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

गैरसमज न बाळगता अवयवदानाविषयी नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे: डॉ. अभिजीत जगताप

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
गैरसमज न बाळगता अवयवदानाविषयी नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे: डॉ. अभिजीत जगताप
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

सोलापूर विद्यापीठात रक्तदान, अवयवदान संकल्प कार्यक्रम

mh 13 news network

सोलापूर, दि. 25- अवयवदान काळाची गरज असून एका मेंदू मृत व्यक्तीपासून सहा ते सात जणांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता अवयवदानाविषयी नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांनी व्यक्त केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त शासनाच्या सूचनेनुसार कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर ‘अवयदान’ याविषयी डॉ. अभिजीत जगताप यांचे व्याख्यान ही पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

डॉ. जगताप म्हणाले की, समाजात अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अवयव दानाविषयी संकल्प देखील करण्याची आवश्यकता आहे. भारतात अवयवदान, देहदान करणाऱ्यांची टक्केवारी खूपच कमी आहे. तुलनेने स्पेन देशात प्रमाण अधिक आहे. आज अनेक रुग्णांना अवयवदानाची गरज आहे. त्यामुळे याचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. हृदय, डोळे, लिव्हर, किडनी, आतडी, त्वचा आदी अवयव आपण दान करू शकतो, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने विद्यापीठात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. कुलसचिव योगिनी घारे यांनीदेखील यात सहभागी होत रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.

फोटो ओळी –
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. केदारनाथ काळवणे

Previous Post

सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार

Next Post

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर

Related Posts

Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
Next Post
स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.