मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोलापूर दौरा नियोजित वेळेतच — अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार देवेंद्र कोठे
सोलापूर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, बुधवारी होणारा सोलापूर दौरा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असून, दौऱ्यात कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे.
या संदर्भात आमदार कोठे यांनी मुख्यमंत्री कार्यालय (CMO) तसेच पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून दौऱ्याची खात्री केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोली येथून नियोजित वेळेतच सोलापूर येथे पोहोचतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“काही माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर मुख्यमंत्रींच्या दौऱ्याबाबत चुकीची माहिती प्रसारित होत आहे. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन आमदार कोठे यांनी केले आहे.

तसेच त्यांनी सर्वांना विनंती केली आहे की, कार्यक्रम स्थळी वेळेवर उपस्थित राहावे आणि दौऱ्याचे आयोजन सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
दरम्यान, आज सोलापुरकरांच्या बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
Kothe Devendra Rajesh
CMOMaharashtra
Devendra Fadnavis
Jaykumar Gore
Subhash Deshmukh
Sachin Kalyanshetti