अमरावती : अमरावती दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सपत्नीक विदर्भाची कुलदेवता श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. दोन्ही संस्थांनच्यावतीने केंद्रीय मंत्री श्री. गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री अंबादेवी संस्थानाचे अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, किशोर बेंद्रे, सुरेंद्र भुरंगे, अशोक खंडेलवाल, डॉ. यशवंत मशानकर, जयंत पांढरीकर यांनी तर श्री एकविरा देवी संस्थानाचे अध्यक्ष डॉ. अनिल खरया, सचिव चंद्रशेखर कुळकर्णी, विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांचा सपत्नीक सत्कार केला. श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे. याबाबत श्री. गडकरी यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.
मंदिराच्या विकास कामाबाबत सदस्य विलास मराठे यांनी प्रास्ताविकेतून माहिती दिली. मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.