MH 13News Network
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून भाजप नेते आमदार श्रीकांत भारतीय यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे लोकसभा निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असून वादाला सुरुवात झाली आहे. सकल मराठा समाजाने या फेसबुक पोस्टच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट..?
![](https://mh13news.com/wp-content/uploads/2024/04/fb_img_17127450523851815108419787350105-183x300.jpg)
श्रीकांत भारतीय यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वतःसोबत एका कुत्र्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर भारतीय असे म्हणतात की, निवडणुकीच्या व्यवस्थापनाची धावपळ कधी पुणे, तर अचानक संभाजीनगर.! तर लगेच हिंगोली..! आणि ठाणे..! निवडणुकीचा काळ हा असाच पण काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरी एक पाहुणा अवतरला..! थेट पटियाला पंजाब मधून शंभू होय शंभूच..! आणि 24 तासात आलेल्या या पाहुण्याने अख्ख घर व्यापून टाकले आणि घरच्या चौघात एक पाचवा आला शंभूचा स्वागत..!
सोलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक
श्रीकांत भारतीय यांची ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे सोलापुरातील सकल मराठा समाज संतप्त झाला असून सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना श्रीकांत भारतीय यांना ताकीद द्या, पोस्ट डिलीट करा अन्यथा राज्यातील शंभूप्रेमी त्यांच्या कुत्र्याला देवेंद्र, नरेंद्र नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पहा..Video
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील कार्यकर्ते ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना अडवून मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावरील एसआयटी चौकशी मागे घ्यावी. हजारो मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे. तसेच 50% च्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांबाबत पुढार्यांना जागोजागी विचारणा केली जात आहे.
श्रीकांत भारतीय यांच्या फेसबुक पोस्टमुळे भाजपा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर पोस्ट व्हायरल केले जात आहेत.