Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उमेद’कडून मतदानाबाबत १.७५लाख कुटुंबांचे समुपदेशन

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
उमेद’कडून मतदानाबाबत १.७५लाख कुटुंबांचे समुपदेशन
0
SHARES
25
VIEWS
ShareShareShare

१०० टक्के मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची माहिती

MH 13 NEWS NETWORK

सातारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सातारा शंभर टक्के मतदान या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्हा कक्षाने जोरदार जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंबाने मतदान करावे, असे आवाहन केले असल्याची माहिती स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

गुगल मीटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उमेद अंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत 2 हजार प्रेरिकांशी ई- संवाद साधत मतदार जनजागृतीबाबत प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी मतदान शंभर टक्के होण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही केली जावी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. या बैठकीत उमेद अभियानात कार्यरत प्रेरीकांनी गावोगावी प्रत्यक्ष गृह भेट घेऊन मतदारांना मतदान करण्याविषयी समुपदेशनाबाबत अवाहन केले होते.

याला प्रतिसाद देत जिल्हा अभियान सहसंचालक विश्वास सिद व जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील 2 हजार प्रेरिकांनी दि. १५ ते १७ नोव्हेंबर रोजी अभियानांतर्गत स्थापित बचत गट, ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्या बैठकांचे आयोजन करून त्यामध्ये १०० % मतदारांनी मतदान करण्याबाबत समुपदेशन केले. या  समुदाय स्तरीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मतदार जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या संपूर्ण उमेद समूहाच्या जाळ्यातून जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर  हजार  कुटुंबाना प्रत्यक्ष गृह भेट देऊन समुपदेशन करण्यात आले. यावेळी संबंधित कुटुंबातील कुटुंब प्रमुखांनी आम्ही मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभागी होऊ, अशी ग्वाही दिली.

ही मोहीम यशस्वी होणेसाठी जिल्हा व्यवस्थापक मनोजकुमार राजे, स्वाती मोरे, संजय निकम तसेच उमेद अभियानात कार्यरत सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी मेहनत घेतली.

Previous Post

तेलुगू भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी – रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा

Next Post

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.