Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तेलुगू भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी – रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
तेलुगू भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी – रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापुरात तेलंगणा भवनसाठी एक कोटीचा निधी देणार.!

काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात जाहीर सभा, पंधरा हजार लोकांची उपस्थिती

सोलापूर : तेलंगणा राज्यात काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या 6 गॅरेंटीचे वचन पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांनी दिलेल्या गॅरंटी बद्दल बोलत नाहीत. महायुतीकडून दोन वर्षाच्या सत्ता काळात लूट केली, त्याची चर्चा झाली नाही असा आरोप करत सोलापुरातील तेलुगु भाषिक नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. सोलापुरात तेलंगणा भवनसाठी एक कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले.

    सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ कुचन नगर आणि सुनील नगर  येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे , माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, उमेदवार चेतन नरोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


  या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणात काँग्रेस सरकारने निवडणूक काळात दिलेल्या सहा गॅरेंटीच्या पूर्ततेचा आढावा मांडला. तेलंगणात शेतकऱ्यांचे 18 हजार कोटीचे कर्ज माफ केले. 50 हजार तरुणांना रोजगार दिला. महिलांसाठी प्रवास योजना या सह विविध योजना यशस्वीपणे राबविला जात आहेत. महाराष्ट्रात महायुती सरकारने केवळ लूट केली असल्याचा आरोप करत त्यावर या निवडणुकीत चर्चा व्हायला हवी होती असे सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या काळात कामे झाली नसल्याने ते काही बोलत नाही. काम करत नसल्याने ते बोलत नाही अशी टीका केली.
    तेलंगणात 50 हजार तरुणांना आम्ही रोजगार दिला. ते पाहण्यासाठी यायचे असेल तर हैदराबाद स्टेडियमवर त्या तरुणांना बोलवतो. त्यामध्ये एक जरी कमी दिसला तर जाहीर माफी मागेल, असे खुले आव्हान महायुतीला दिले. तेलंगणातील विकास कामे पाहण्यासाठी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अवश्य यावे. त्यांना येण्यासाठी अडचण असेल तर मी विमान पाठवितो, असेही खुले आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले. 
   सोलापुरातील तेलुगु भाषिक हा नेहमीच काँग्रेसच्या खंबीरपणे पाठीशी राहिला आहे. यंदाच्याही निवडणुकीत ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहणार आहेत. येथील मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले. 

तेलंगणा भवनसाठी एक कोटी रुपये देणार..!

सोलापुरात तेलुगु भाषिकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारकडून सोलापुरात तेलंगणा भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले. यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे असा विश्वास व्यक्त करत दोन कोटी रुपयांमध्ये हे तेलंगणा भवन उभारावे उर्वरित एक कोटी रुपये महाविकास आघाडी सरकार कडून काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिळवून देण्यात येईल, असे यावेळी यांनी स्पष्ट केले.

मार्कंडेय मंदिरात घेतले मनोभावे दर्शन

यादरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मार्कंडेय मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. या मंदिरात दर्शन घेतल्याने मोठे समाधान लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावरचा विश्वास ; मनसे उमेदवार महादेव कोगनुरे

Next Post

उमेद’कडून मतदानाबाबत १.७५लाख कुटुंबांचे समुपदेशन

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
उमेद’कडून मतदानाबाबत १.७५लाख कुटुंबांचे समुपदेशन

उमेद’कडून मतदानाबाबत १.७५लाख कुटुंबांचे समुपदेशन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.