Wednesday, July 2, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पत्नीस पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीसह तिघे निर्दोष

MH13 News by MH13 News
19 December 2023
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
165
VIEWS
ShareShareShare

सोलापूर दि:- पूनम किरण गुळवे वय:-22 हिचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पती किरण दीनानाथ गुळवे वय 22, सासरा दीनानाथ रामचंद्र गुळवे वय 53, सासु कलावती दीनानाथ गुळवे वय:- 45, सर्व रा:- निराळे वस्ती, मुरारजी पेठ,सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी.शिरभाते यांच्यासमोर होऊन गुन्हा शाबित न झाल्याने त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, यातील मयत पूनम हिचे लग्न आरोपी किरण याच्यासोबत दि:-19/5/2014 रोजी झाले होते. लग्नानंतर पुनम ही नांदण्यास आल्यावर तिचा पती किरण, सासरा दीनानाथ व सासू कलावती हे तिस लग्नात तुझ्या आई-वडिलांनी मानपान केला नाही,तसेच तिस कॉलेजला जाण्यासाठी गाडी घेण्याकरता माहेरहून 50000 रुपये घेऊन ये म्हणून सतत त्रास देत होते व तिस तू पांढऱ्या पायाची आहे, असे म्हणून कायम जाचहाट करीत होते,

दि:-26/8/2014 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास मयत पूनम व तिचा नवरा किरण यांच्यात भांडण चालू असताना सासरा दीनानाथ व तिचा पती किरण यांनी मयत पूनम हिचे हात धरले व सासू कलावती हिने तिचे अंगावर रॉकेल ओतून काडेपेटीने पेटवून देऊन जाळून जीवे ठार मारले, त्यावर तिस उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता, वरील आशयाची हकीकत तिने बहिणीसमोर सांगितली होती.

उपचारादरम्यान दि:-27/8/2014 रोजी ती मयत झाली, त्यावर पुनम हिचे वडील अशोक पांडुरंग मोटे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात एकंदर नऊ साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात मयत पूनम ही बोलण्याच्या स्थितीत होती तर तिचा न्यायदंडाधिकारी यांचे समोर जबाब का घेतला नाही ? यावरून तिने बहिणी पुढे जबाब दिला हे विश्वासार्ह वाटत नाही असा युक्तीवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे,ऍड विनोद सूर्यवंशी, ऍड दत्ता गुंड तर सरकारतर्फे ऍड प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.

Tags: Solapur Maharashtra police
Previous Post

देशी गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसासह एकास गुन्हे शाखेकडून अटक

Next Post

सिम्पोलो व्हिट्रिफाइडचे महाराष्ट्रात आपलं अस्तित्व मजबूत करत सोलापुरात पदार्पण : पंकज कुमार

Related Posts

हकालपट्टी! मराठा क्रांती मोर्चाचा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एल्गार..! Live
राजकीय

हकालपट्टी! मराठा क्रांती मोर्चाचा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एल्गार..! Live

1 July 2025
इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..
आरोग्य

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..

28 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!
शैक्षणिक

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

26 June 2025
Next Post

सिम्पोलो व्हिट्रिफाइडचे महाराष्ट्रात आपलं अस्तित्व मजबूत करत सोलापुरात पदार्पण : पंकज कुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.