दिलीपराव माने विचार मंचचा दांडिया फेस्टिवल उत्साहात, गरब्याच्या ठेक्यावर थिरकले सोलापूरकर
नवरात्रीच्या मंगल पर्वाच्या निमित्ताने दिलीप माने विचारमंच आणि आदिती फाऊंडेशनच्या वतीने जुळे सोलापूरमध्ये गुरुवारी भव्य-दिव्य दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सोलापूरकरांनी गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत हा दांडिया फेस्टिवल अधिक रंगतदार बनवला.
या कार्यक्रमास माजी आमदार दिलीप माने, युवा नेते पृथ्वीराज माने, यांच्यासह अश्विनी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर अमित पटेल, गांगजी मिल्स शोरूमचे अमित गांगजी, डॉ. दामा, डॉ सचिन तावसे, डॉ. अभीषेक शाह,डॉ. स्वाती चिट्टे, डॉ. गोळवलकर, डॉ. प्रिया मेंगजी, इन्स्पायर अकॅडमीचे श्री व सौ मलाड, सौ,शैलजा राठोड, प्राध्यपिका रोकडे, श्री. शहा , श्रीकांत मेळगे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नवरात्रीच्या निमित्ताने जुळे सोलापूरमध्ये पहिल्यांदाच अशा भव्य स्वरूपात दांडिया फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. शहर आणि ग्रामीण भागातील युवक-युवती आणि महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून आले.
नागरिकांच्या उत्साहाचे कौतुक करताना माजी आमदार माने म्हणाले, “सोलापूरकरांचा सहभाग पाहून आनंद वाटतो. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपली संस्कृती टिकवण्यासाठी आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकले आहे. तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे हा महोत्सव संस्मरणीय ठरला आहे.
“महोत्सवात लहान मुलांसह युवा वर्गाचा सहभाग आणि उत्साह विशेष उल्लेखनीय होता. रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपारिक नृत्य, आणि मनमोहक गरब्याने उपस्थितांना भारावून टाकले.
महोत्सवाच्या दरम्यान वातावरणात एक वेगळाच आनंद आणि चैतन्य अनुभवायला मिळाले. “हा उत्सव फक्त नृत्याचा नव्हे, तर एकतेचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव आहे,” असे माने म्हणाले.
या दांडिया फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट दांडिया सादरीकरण करणाऱ्या सहभागींचा विशेष सन्मान करण्यात आला.
विजेत्यांना पृथ्वीराज माने यांच्या हस्ते उत्कृष्ट दांडिया पुरस्कार वितरित करण्यात आले. या पुरस्कारामुळे सहभागींच्या आनंदात अधिक भर पडली, आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळाले.
हे ठरले विजेते
15 वर्षाखालील विजेते दुर्गा सागर साळुंखे, प्रिया उटगी, सोनिया जक्कन, स्वरांजली जगदाळे, प्रतिभा म्हम्हाणे, स्वरा कोठारी,
वैयक्तिक दांडिया-गरबा विजेते.एकता कांबळे, सफा शेख, रोशनी हुंडारे, अमृता वर्मा
वयोगट 40 वर्षा पुढील विजेते -शैला सावने, गीता हुंडारे, नीलफर बागवान, सारिका मदने
विजेते ग्रुप मॉडेल कॉलनी ग्रुप, राजमाता ग्रुप, वुमन्स पॉवर ग्रुप, जागृत ग्रुप सैफुल, हिरकणी ग्रुप