MH13NEWS Network
मानेगाव येथे भगीरथ योजनेतून 11 के.व्ही.ए. लाईनचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनमाढा तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा संकल्प
माढा / पंढरपूर – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या प्रयत्नातून भगीरथ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 11 के.व्ही.ए. विजेच्या लाईनचे उद्घाटन आज मानेगाव येथील सबस्टेशनवर आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडले.

या नव्या विजेच्या लाईनमुळे मानेगाव व परिसरातील नागरिकांना सुलभ व अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.या वेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, “माढा तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. प्रत्येक डीपीवरील ऍडिशनल लाईनचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले असून, भविष्यात कोणत्याही भागात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपयोजना राबविण्यात येणार आहेत,” असे त्यांनी आश्वासन दिले.

पूरस्थितीत तालुक्यात निर्माण झालेल्या अडचणींचा उल्लेख करताना आमदार पाटील म्हणाले, “पूरग्रस्त भागातील मदत ही आमची जबाबदारी आहे, जाहिरात नव्हे. आम्ही केलेली मदत हे आमचे कर्तव्य आहे आणि पुढेही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला विलास बप्पा देशमुख, बाळासाहेब ढवळे, रामकाका मस्के, सुरेश पाटील, प्रतापराव देशमुख, बाळासाहेब ढेकणे, सुवर्णाताई शिवपुरे, विनंतीताई कुलकर्णी, भाऊसाहेब महाडिक, निलेश बापू पाटील, दिनेश जगदाळे, ऋषिकेश तांबिले, महादेव साबळे, संजय पारडे, बप्पा शेळके, राहुल पारडे, मिटू मुकणे, बापू भोगे, विलास पारडे, आबासाहेब साठे, बाळासाहेब राऊत, संजय तांबिले, गणेश उमाटे तसेच मानेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्यानिमित्त मानेगाव आणि परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामविकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.