MH 13 NEWS NETWORK
सोलापूर, दि. 8 – दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या गुरुवारी झालेल्या गावभेट दौ//र्यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा, मद्रे, सिंदखेड, संजवाड, औराद, राजूर, बिरनाळ आणि होनमूर्गी या गावांमध्ये नागरिकांनी काडादी यांचे जल्लोषात स्वागत केले. गेल्या दहा वर्षांपासून टक्केवारीच्या राजकारणाला कंटाळलो असून आता परिवर्तनासाठी अपक्ष उमेदवार काडादी यांना विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
मद्रे येथे झालेल्या बैठकीत माजी सरपंच मुजीब शेख यांनी गेल्या दहा वर्षांत दक्षिण सोलापूरच्या अधोगतीचे पाढे वाचले. दहा वर्षे आमदार आणि कॅबिनेट मंत्री असलेले सुभाष देशमुख यांनी गोड बोलून लोकांची फसवणूक केल्याचा टोला शेख यांनी लगावला. काडादी यांनी कारखाना चालवताना सचोटी जपल्याने आमच्या अनेक पिढ्यांवर त्यांचे उपकार आहेत. त्यामुळे विकासात कधीही राजकारण न केलेल्या धर्मराज काडादी यांना विजयी करण्याचा एकमुखी संकल्प मद्रे येथील गावक//र्यांनी केला. यावेळी गेनसिध्द मोटे, भीमाशंकर गावडे, अमीन चांदसाहेब पटेल आदी मान्यवर उपिस्थत होते.
घोडा तांडा येथे तुळशीराम राठोड यांनी काडादी यांचे स्वागत केले. यावेळी मेघराज चव्हाण, मिथुन राठोड, दशरथ नाईक यांच्यासह अन्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंदखेड गावभेट दौ//र्याप्रसंगी मल्लिनाथ मोकाशी यांच्या हस्ते काडादी यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी भरमण्णा गावडे, सोसायटी चेअरमन शिवानंद पाटील, चिदानंद माळेवाडी, राजशेखर शिवशरण, माजी सरपंच रवींद्र इंगळे, बसवराज गवसने, अप्पासाहेब पाटील, शंकर पाटील, अशोक भुसारे, वैजनाथ माळेवाडी, राजशेखर भुसारे, राम मात्रे, शिवानंद मोकाशी, सिध्दाराम कोरे, रेवणसिध्द कोरे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीशैल माळेवाडी तर राघवेंद्र माळेवाडी यांनी आभार मानले.
औराद येथे बाबूराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत धर्मराज काडादी यांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला. सिध्दाराम घेरडी यांनी गावक//र्यांच्यावतीने काडादी यांचे स्वागत केले. यावेळी लिंगराज पाटील, बाळासाहेब बिराजदार, अशोक आळगी, श्रीशैल बनगोंडे, प्रकाश बिराजदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राजूर येथे झालेल्या बैठकीत अशोक देवकते यांनी काडादी यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते.
बिरनाळ येथे झालेल्या बैठकीत गावक//र्यांच्यावतीने कांतू पुजारी यांनी काडादी यांचे स्वागत केले. यावेळी मल्लय्या स्वामी, सिध्दाराम बिदाजदार, अत्तार गुरुजी, सिध्दाराम पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
होनमुर्गी येथील बसवेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत बसवराज हसापुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी चिदानंद इळगी, धर्मण्णा काळे, गिरमल्ल मेंडगुदळे, बसवराज उंबरजे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काडादी हे सर्वसंमतीचे उमेदवार ः हसापुरे
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील धर्मराज काडादी यांची उमेदवारी एका व्यक्तीची अथवा एका पक्षाची नाही. काडादी हे सर्व संमतीचे उमेदवार आहेत. ज्येष्ठ नेतेमंडळींच्या आग्रहानुसार काडादी यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सुरेश हसापुरे यांनी केले. पक्षीय मतभेद आणि आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून यावेळी काडादी यांना मतदान करण्याची गरज आहे. गेली दहा वर्षे सुडाच्या राजकारणामुळे आपण सारेच होरपळून गेलो आहोत. आम्हा सर्वांची लढाई भाजपच्या विरोधात आहे. भाजपला पराभूत करण्याची क्षमता फक्त काडादी यांच्यामध्येच आहे. त्यासाठी मतविभागणी टाळून इतर कोणाचाही विचार न करता काडादी यांनाच विजयी करण्याचे आवाहन हसापुरे यांनी केले.