MH 13News Network
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डिजिटल पत्रकार संघाची वज्रमुठ
सोलापूर:सोलापूर डिजिटल पत्रकार संघाची बैठक गुरुवारी सकाळी मुख्य कार्यालय रंगभवन येथे संपन्न झाली.लोकशाही पद्धतीने डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची निवड झाली.लोकप्रधान न्यूज चॅनलचे कर्तव्य दक्ष पत्रकार अर्जुन चव्हाण यांची सचिवपदी निवड झाली.
सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख,यशवंत पवार ,अक्षय बबलाद, इरफान शेख, सैफन शेख,उजेर इनामदार,इरफान पटेल, कायदेशीर सल्लागार अँड. दिलीप जगताप हे उपस्थित होते.
लोकप्रधानचे प्रतिनिधी अल्ताफ शेख यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. जनशक्ती न्युजचे सर्वेसर्वा इलियास सिद्धीकी यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली.डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने मुख्य कार्यालय रंगभवन येथे अल्पदरात पत्रकार परिषद घेतल्या जाणार असल्याची माहिती यशवंत पवार,जमीर शेख यांनी दिली.
डिजिटल माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य प्लॅटफॉर्म मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डिजिटल पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे.नव्या कार्यकारिणीची मुदत एक वर्षाची असेल आणि एक वर्षा नंतर पुन्हा एकदा नवी कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवड केली जाईल.डिजिटल पत्रकार संघाच्या सदस्यांना मोफत अपघाती विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.डिजिटल माध्यमांमधून युट्युब,वेबसाईट आणि ब्लॉगच्या माध्यमां मधून अन्यायला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवरच अन्याय होत आहे.त्यामुळे मजबूत संघटना स्थापन करण्यात आली आहे.
बैठकीला श्रीनिवास बोगा,सद्दाम शेख,अश्फाक शेख,शब्बीर मणियार,इरफान मंगलगिरी,कुणाल धोत्रे,राजेश वडीशेरला,जहुर सय्यद,नबीलाल शेख,मोहसीन बागवान, गफूर सौदागर,अकबर बागवान,अजमेर शेख,सिद्धलिंग नवले,वैभव जावळे,योगीनाथ स्वामी,अफजल शेख,नानासाहेब ननवरे, वाहिद शेख,इरफान शेख,सोहेल शाहनूरकर,आदी पत्रकार आणि उपसंपादक आणि संपादक बैठकीला उपस्थित होते.