MH 13 News Network
जैन गुरुकुलचा’ दिग्विजय सुरवसे राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय
सोलापूर – राष्ट्रसेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धा’ पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १२५ शाळांमधून ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेचा दिग्विजय शक्तीसागर सुरवसे (९’क’) याने नारायण भोसले लिखित देशोधडी’ या पुस्तकावर आधारित अभिप्राय लेखन व कथन केले.
या उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्याला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला. त्याला सन्मानचिन्ह व रोख रु. ७००० चे बक्षीस व प्रशालेस सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. त्याला प्रशालेतील सहशिक्षक मिलिंद खोबरे व विकास शिळ्ळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.