MH 13News Network
छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी स्वतःचा स्वराज्य पक्ष निर्माण केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाचे उमेदवार उभे राहणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू करण्यात आलेल्या असून सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा. महादेव तळेकर यांची निवड केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर व नूतन निवडी संदर्भात दिनांक 1/ 2 /2024 गुरुवार रोजी सोलापूर समाज कल्याण केंद्र येथे जिल्हाध्यक्ष प्रा, श्री महादेव तळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उपस्थित स्वराज्य पक्ष राज्य उपाध्यक्ष श्री फत्तेसिंह सावंत सरकार, धाराशिव जिल्हाप्रमुख महेश गवळी, सोलापूर उपजिल्हाप्रमुख संतोषजी जाधव व उपजिल्हाप्रमुख सचिनजी महाकाळ व युवक जिल्हाप्रमुख पैलवान आबा काळे ॲड.गणेश विलास कदम सोलापूर शहर प्रमुख ,वकिल आघाडी उपशहर प्रमुख सोलापूर श्री परमेश्वर (आबा) सावंत आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .
यावेळी इजाज हुंडेकरी सोलापूर शहर युवक, प्रदीप घागरे जिल्हा संघटक सोलापूर, प्रशांत हिरगुडे करमाळा तालुका प्रमुख , अमर रणपिसे उत्तर सोलापूर तालुका प्रमुख , ऋषीकेश गिड्डे जिल्हा युवक उपाध्यक्ष ,आदींच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले .
अध्यक्षीय भाषणात पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या सूचना देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करावा स्वराज्य संस्थापक छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या वाढदिवसाची जिल्हा कडून शाखा काढून भेट देऊ असे आश्वासन दिले. त्यांच्या निवडीमुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, सचिन महांकाळ, युवक जिल्हाप्रमुख पैलवान आबा काळे, उत्तर सोलापूर व्यापारी आघाडी प्रमुख विश्वास चव्हाण, सज्जनराव भोसले , विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख श्री आशुतोष तोडसे, उत्तर सोलापूर तालुका युवती प्रमुख कु.अनुजा पाटील, उत्तर सोलापूर मोहोळ मंगळवेढा ,पंढरपूर सांगोला माढा. अक्कलकोट आदी भागातील पदाधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन उत्तर सोलापूर तालुका सचिव धर्मराज भोसले व सुनील मामा सुरवसे यांनी केले.