Tuesday, October 21, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मोदींच्या हजारो कोटींच्या विकासकामांमुळे सोलापूरकर राहणार महायुतीच्याच पाठीशी.! – राम सातपुते, भाजप उमेदवार ⭕

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in राजकीय, सोलापूर शहर
0
मोदींच्या हजारो कोटींच्या विकासकामांमुळे सोलापूरकर राहणार महायुतीच्याच पाठीशी.! – राम सातपुते, भाजप उमेदवार ⭕
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विश्वास : दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळावा उत्साहात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांमुळे सोलापूरकर महायुतीच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत असा विश्वास भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाइं महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला. दक्षिण सोलापूर विधानसभेचा संवाद मेळावा सोमवारी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्लेदार मंगल कार्यालयात झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, शशिकांत चव्हाण, डॉ. चनगोंडा हविनाळे, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, भाजपा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष राम जाधव, दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी,
आप्पासाहेब पाटील, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, महिला दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष अंबिका पाटील, मळसिद्ध मुगळे, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, आनंद बिराजदार, आप्पासाहेब मोटे, मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव, माजी नगरसेविका संगीता जाधव, महिला मंडळ अध्यक्ष नीलिमा शितोळे, महेश देवकर, डॉ. शिवराज सरतापे, भटके विमुक्त विकास युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, सोमनाथ साठे आदी उपस्थित होते.

आमदार राम सातपुते म्हणाले की निवडणूक देशाची निवडणूक आहे. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेला सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची कन्या अशी निवडणूक होणार आहे. विरोधक सातत्याने ‘भाजपच्या खासदारांनी केलेली कामे सांगा’ असे आव्हान देत आहेत. सोलापूर शहराला बायपास रस्ता, विडी कामगारांना ३० हजार घरे, ६५ हजार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये, मुद्रा योजनेच्या माध्यमातून अडीच लाख जणांना १ हजार ७०० कोटींचे कर्ज, अडीच लाख जणांना उज्वला गॅस कनेक्शन, ८५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये जलजीवन मिशनची कामे, ४० हजार कोटींची रस्त्यांची कामे, श्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी, सोलापूर विमानतळाला दिलेला ६० कोटी रुपयांचा निधी, समांतर दुहेरी जलवाहिनीसाठी दिलेला ६५० कोटी रुपयांचा निधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला दिलेला १६४ कोटी रुपयांचा निधी अशा शेकडो कामे भाजपाच्या यापूर्वीच्या दोन खासदारांनी केली आहेत. याची मोठी यादी भाजपाकडे आहे. आता काँग्रेसला त्यांनी गेल्या ७५ वर्षातील कामांचा हिशोब द्यावा लागणार आहे. काँग्रेसने केलेल्या भारतीय सैनिकांच्या अपमानाचा, सीएएला केलेल्या विरोधाचा वचपा सोलापूरकर नक्की काढणार आहेत.

सोलापूरची जनता कामगाराच्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे प्रत्येक बूथवर ही निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीला लागावे, असे आवाहन याप्रसंगी महायुतीचे आमदार राम सातपुते यांनी केले.

हणमंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर शिवराज सरतापे यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया…

Next Post

भाजप उमेदवार राम सातपुते यांनी घेतले जगदगुरु महास्वामीजींचे आशिर्वाद

Related Posts

माजी सरपंच आत्महत्येप्रकरणी नर्तकी पूजा गायकवाड प्रकरणी न्यायालयातून मोठी अपडेट
गुन्हेगारी जगात

माजी सरपंच आत्महत्येप्रकरणी नर्तकी पूजा गायकवाड प्रकरणी न्यायालयातून मोठी अपडेट

18 October 2025
“साहेब” महायुती झाल्यास..! जेव्हा शिवसेना जिल्हाप्रमुख मुख्यमंत्र्यांना बोलतात..!
महाराष्ट्र

“साहेब” महायुती झाल्यास..! जेव्हा शिवसेना जिल्हाप्रमुख मुख्यमंत्र्यांना बोलतात..!

15 October 2025
प्रतीक्षा संपली..| मुख्यमंत्री उद्या सोलापूर दौऱ्यावर..! मुंबई विमान सेवेस होणार प्रारंभ..
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोलापूर दौरा नियोजित वेळेतच — अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार देवेंद्र कोठे

15 October 2025
फौजदारांशी झोंबाझोंबी प्रकरणी माजी नगरसेवक निर्दोष
राजकीय

फौजदारांशी झोंबाझोंबी प्रकरणी माजी नगरसेवक निर्दोष

16 October 2025
प्रतीक्षा संपली..| मुख्यमंत्री उद्या सोलापूर दौऱ्यावर..! मुंबई विमान सेवेस होणार प्रारंभ..
कृषी

प्रतीक्षा संपली..| मुख्यमंत्री उद्या सोलापूर दौऱ्यावर..! मुंबई विमान सेवेस होणार प्रारंभ..

14 October 2025
लोकमंगल फाउंडेशनचा ‘एक मुट्ठी अनाज’ उपक्रम यशस्वी
महाराष्ट्र

लोकमंगल फाउंडेशनचा ‘एक मुट्ठी अनाज’ उपक्रम यशस्वी

14 October 2025
Next Post
भाजप उमेदवार राम सातपुते यांनी घेतले जगदगुरु महास्वामीजींचे आशिर्वाद

भाजप उमेदवार राम सातपुते यांनी घेतले जगदगुरु महास्वामीजींचे आशिर्वाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.