सातारा – उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राहूल कदम, अग्रणी बँक व्यवस्थापक योगश पाटील यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या संशयास्पद होणाऱ्या व्यवहारांची माहिती, निवडणूक अधिकारी व खर्च सनियंत्रण पथकाला तात्काळ कळवावी. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत अथवा एटीएमध्ये भरणा करण्यासाठी पैशांची वाहतूक करतांना भारत निवडणूक आयोगाने इलेक्शन सिजर मॅनेजमेंट सिस्टीम दिलेली आहे यामध्ये पूर्ण मार्गासह व्यवस्थीत माहिती भरावी. वाहतूक करणाऱ्या व हाताळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची ओळखपत्रे सोबत आसणे आवश्यक आहे. पतसंस्थांना जिल्हाधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जो नमुना तयार त्यामध्ये माहिती भरुनच त्यांनी पैशांची वाहतूक अथवा देवान घेवाण करावी. याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत दिल्या.
.