mh 13 news network
महान भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. व्यंकटरमन यांचा २८ फेब्रुवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य सेमी इंग्रजी च्या चिमुकल्यांनी वृक्षारोपण करून महान शास्त्रज्ञ सी. व्ही. व्यंकटरमन यांना अभिवादन करण्याबरोबरच पर्यावरण समतोल साधण्यासाठी आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला.


या चिमुकल्यांना शिक्षिका सुरवसे मॅडम, कोळी मॅडम, पवार सर व सेमी इंग्रजी विभाग प्रमुख श्री. शशी अंकलगे सर यांचे प्रोत्साहन मिळाले. या लहान चिमुकल्यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे, त्यांच्या प्रयत्नाचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे संचालक व मार्गदर्शक मा. मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेचे आधारवड व हन्नूर प्रशालेचे माजी प्राचार्य मा. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका व मार्गदर्शिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूर चे उपसरपंच व युवा नेते मा.सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुक केले.