MH 13 News Network
वीरतपस्वी प्रशालेत पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभ संपन्न”
‘चिकाटी, धाडस व आत्मविश्वास या अदृश्य शक्ती आहेत’ प्राचार्य – श्री. राम ढाले
सोलापूर : “समाजातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने नियतकालिके व वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. त्याचे स्मरण म्हणून पत्रकारिता दिन साजरा केला जातो. पत्रकारांमध्ये चिकाटी, धाडस व आत्मविश्वास या अदृश्य शक्ती आहेत. त्या नेहमी जागृत ठेवून समाजाचा प्रवास सुलभ करण्याचे कार्य पत्रकारांकडून केले जाते.” असे श्री बृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेत पत्रकार दिन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राम ढाले सर यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सोलापूर शहरातील नामवंत पत्रकार सागर बाडकर, छगन बुरडे- व्यवस्थापक दै. लोकमत, शिवानंद येरटे – सम्यक न्यूज चॅनल सोलापूर, महेश हनमे – MH 13, किरण बनसोडे – तरुण भारत, मकरंद ढोबळे – स्वराज्य न्यूज, योगेश कल्याणकर – ज्ञान न्यूज, विकास कस्तुरे – मेट्रो चॅनल सोलापूर, अमर हुमनाबादे- जय हिंद न्यूज, सुनिल कोडगी – सिटी न्यूज इ. पत्रकारांचा यथोचित सत्कार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे व प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसर्जे यांनी केले.