सोलापूर – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेला सुविधा देणेसाठी आपण कटीबध्द आहोत. जिल्हा परिषदेच्या विकासाला गती देणे साठी सहकार्य करा. विकास कामात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांनी केले. जिल्हा परिषदेत मराठी पत्रकार दिन साजरा करणेत आला.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा शाल व पेन व लिहिणे साठी डायरी देऊन सन्मान करणेत आला.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनिषा वाकडे, सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, सचिव बगले, खजिनदार मनोज भालेराव प्रमुख उपस्थित होते.
धोरणात्मक कामासाठी पुढे राहूयात- सिईओ कुलदीप जंगम
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास या एकाच ध्येया साठी आपण सर्वजण मिळून काम करीत आहोत. लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. ज्या गोरगरीब जनते पर्यंत सुविधा पोहचू शकत नाही त्यांचे पर्यंत माहिती देणेच काम पत्रकार करतात. कर्मचारी यांचे कडून माहिती येणे पुर्वी पत्रकाराकडून माहिती अगोदर मिळते. आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही. पत्रकार आम्हाला सोडू शकत नाहीत. विकासाला दिशा देणे साठी सहकार्य करा. आम्ही आमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करू अशी ग्वाही देत विकास कामात पत्रकारांचे योगदान खुप मोठे आहे असेही सिईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.
सकारात्मक संकल्पना निदर्शनास आणा- अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर
सध्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नसलेने पत्रकार हेच कान व डोळे आहेत. क्षेत्रीय स्तरावर काय घडते याचा फिडबॅक देणेचे काम पत्रकार करतात. सर्वजण जिल्हा परिषदेच्या विकास कामा साठी एकत्र येऊन काम करतो. परंतू काम करीत असताना सकारात्मक चांगल्या संकल्पना निदर्शनास आणून द्या असे आवाहन अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी केले.
पत्रकार यांचे विकास कामात महित्वाचे योगदान – उपमुकाअ स्मिता पाटील
स्वातंत्र्याच्या चळवळी पासून ते आता पर्यंत लोकशाहीत पत्रकार यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. विकास कामांची माहिती सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचविणेसाठी प्रशासनास महत्वाची मदत होत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आवर्जून सांगितले. या प्रसंगी जिल्हा परिषदे बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांचा सन्मान जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. सिईओ जंगम यांनी अल्पावधीत विकास कामांना गती दिली आहे. झिरो पेडन्सीचे आदर्श काम करणारे सिईओ जंगम यांच्या कार्याचा गौरव केला.
राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी पत्रकारांच्या कार्याची दखल जिल्हा परिषद घेत आली आहे. पुरस्कार योजना पुढे कार्यरत ठेवण्यात विनंती करून प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.
या कार्यक्रम साठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शना खाली स्वीयसहाय्यक सुधाकर माने- देशमुख,सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, सिईओ कक्षातील वरिष्ठ सहाय्यक सुरज नदाफ, कनिष्ठ सहाय्यक अकेले यांनी कार्यक्रम यशस्वी करणे साठी परिश्रम घेतले. प्रास्तविक व सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. संवाद सल्लागार सचिन सोनवणे , जनसंपर्क कक्षातील सहाय्यक मेहताब शेख यांनी आभार मानले.