स्वयंम शिक्षा फाउंडेशनतर्फे बुधवारी उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळावा युवक – युवतींना संधी देण्यासाठी ऍड. सोमनाथ वैद्य यांचा पुढाकार !
सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ऍड. सोमनाथ वैद्य यांच्या वतीनेबुधवार दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजीसकाळी 11 ते 4 यावेळेत सोलापुरातील युवक – युवतींसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जुळे सोलापुरातील मयूर क्लासिक मल्टिपर्पज हॉल येथे हा मेळावा होणार आहे या मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते कुमार करजगी, प्रवचनकार बसवराज स्वामी यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करण्यात येत आहेत. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ माहिती लिंगायत समाजातील युवकांना व्हावेत यासाठी सोलापुरात प्रथमच हा कार्यक्रम होत आहे. विशेष म्हणजे युवकांना विविध कंपनीत रोजगार मिळून देण्यासाठी सर्वंकष विकासाचे व्हिजन असलेले ऍड. सोमनाथ वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे.
या कार्यक्रमास पुणे , पिंपरी – चिंचवड येथील विविध कंपन्या व सोलापूर मधील विविध कंपन्यामध्ये रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच युवकांना मुलाखत तयारी, नोकरी, कौशल्यविकास यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेती, सेवा क्षेत्र, पर्यटन, प्रक्रिया उद्योग, ग्रामीण उद्योग सुरू करण्यासाठी नामांकित उद्योजकांचे अनुभव यावेळी ऐकता येणार आहे. युवक – युवतींना विविध आवडीचे उद्योग सुरू करण्यासाठी व रोजगार मिळविण्यासाठी यातून प्रेरणा मिळेल, तसेच नवीन स्टार्टअपसाठी स्वयंम शिक्षा फाउंडेशनच्या वतीने विशेष मदत मिळणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून तरी यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 7219099955 / ऑफिस 9975909790 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन ॲड. सोमनाथ वैद्य यांनी केले आहे.
हे मान्यवर करणार मार्गदर्शन ..
या मेळाव्यात ज्येष्ठ गांधीवादी अभ्यासक प्रा. नरेश बदनोरे, अमरावतीच्या अग्निपंख फाऊंडेशनचे सचिव विक्रमसिंग मगर, महात्मा बसेवश्वर वचन साहित्य अभ्यासक प्रा. डॉ. भिमाशंकर बिराजदार , व्हीव्हीपी कॉलेज प्राचार्य प्रा. डॉ. राहुल गायकवाड , वक्ते अमोल तळेकर (पुणे), माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, कौशल्यविकास प्रशिक्षक अमित कामतकर , ट्रेनर अॅन्ड कौन्सिलर प्रा.आय. आय. मुजावरआदी मान्यवरांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होणार आहे.