MH 13 News Network
सोलापूरचे प्रसिद्ध बारदानाचे व्यापारी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष,श्रीशैलम येथील श्री सिद्धेश्वर अन्नछत्रमचे विश्वस्त श्री विश्वनाथ ईरप्पा रिक्के यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज बुधवारी २३/४/२५ रोजी दुपारी. ४ वा. राहत्या घरा पासून शिवगंगा मंदिर जवळ निघणार आहे.
शहरातील अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ज्येष्ठ आश्रयदाते, नामवंत बारदाना व्यापारी,मंगळवार पेठ पोलिस चौकीजवळील में.अनिल सुनिल रिक्के फर्मचे मालक,पश्चिम मंगळवार पेठेतील प्रतिष्ठीत नागरीक विश्वनाथ ईरप्पा रिक्के (वय वर्षे ९२)यांचे,मंगळवार दि.२२ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
व्यापारप्रपंचासोबतच त्यांनी सोलापूरातील अनेकविध सामाजिक संस्थांच्या कार्यभारात बहुमोल सहभाग दिला.रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे माजी अध्यक्ष व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव या पदावरून त्यांनी जबाबदा-या सांभाळल्या.ते सोलापूर बारदाना व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते.
तसेच ते संगमेश्वर महाविद्यालयाचे विश्वस्तही होते.बेळगाव येथील के.ल.ई.संस्थेचेही ते सदस्य होते.श्रीक्षेत्र श्रीशैलम येथील,श्री.सिध्दरामेश्वर अन्नछत्रम संस्थेच्या व तेथील वास्तूच्या उभारणीतही कै.विश्वनाथ रिक्के यांचा मोलाचा सहभाग होता.त्यांच्या पश्चात पत्नी,०४ मुले,सुना,नातवंडे आणि रिक्के-वर्दा परिवाराचे मोठ्या संख्येतील आप्तेष्ट आहेत.सोलापूरातील बारदाना व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनिल रिक्के यांचे ते वडिल होत
त्यांची अंत्ययात्रा शिवगंगा मंदिराजवळील रहात्या निवासस्थानापासून ,बुधवार दि.२३ एप्रिल २०२५ रोजी दु.३:०० वाजता निघेल.आणि रुपाभवानी रोडवरील,विश्रांती चौक येथील रूद्रभूमीत अंत्यसंस्कार होतील.