28 नोव्हेंबरला सोलापूरात ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सोलापूर (प्रतिनिधी) – अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद व प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह (एससी) येथे सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल आयोजित केला आहे.
कार्यक्रमात सत्यशोधक गीते, सावित्रीमाईंच्या कविता–ओव्या, पत्रलेखन अभिवाचन, ‘मी सावित्रीमाई फुले बोलतेय’ हे प्रबुद्ध नाट्य तसेच राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती संयोजक अभिनेते डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी दिली.
फेस्टिव्हलचे उद्घाटन भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अंबादास शिंदे (प्रदेश अध्यक्ष, दलित पँथर) असतील.
डॉ. नसिमा पठाण, योगीराज वाघमारे, सुशिला वनसाळे, प्रमोद सरवदे, यशवंत पवार आदी मान्यवर उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात ‘क्रांतीसूर्य जोतीबा फुले’, ‘एकच स्वप्न प्रबुद्ध भारत’ या ग्रंथांचे व ‘बौद्धिस्ट थिएटर’ विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.
प्रबुद्ध पुरस्कारांमध्ये..हे आहेत मान्यवर..
भीमशाहीर संदीप शिंदे (गीतकार – मरणोत्तर), भानुदा जीवणे (नाटककार), राजीव शिंदे (ग्रंथकार), प्रा. प्रियंका सितासावद (अभिनेत्री), राहुल खांडेकर (पत्रकार), प्रबुद्ध साठे (प्रबुद्धनायक), अॅड. डॉ. बाबा वानखेडे (विधीज्ञ), आनंद सरवदे (सिने दिग्दर्शक) यांचा समावेश आहे.
फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी संयोजन समितीचे अक्षय बबलाद, कल्याण श्रावस्ती, फारुख शेख, यू. एफ. जानराव, प्रा. शंकर खळसोडे, मारुती बेलभंडारे आणि प्रा. जीवन शिंदे यांनी बहुजन समाज तसेच कलावंत–कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.








