Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कोळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश

MH13 News by MH13 News
11 months ago
in शैक्षणिक, सामाजिक
0
कोळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश
0
SHARES
44
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

कोळा (वार्ताहर) कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून डिसेंबर 2024 मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे 09 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून यापैकी 08 विद्यार्थ्यांना एन.एम.एम. एस.शिष्यवृत्ती तर 01 विद्यार्थ्याला छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षामध्ये एकूण 422400/- रुपये एवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे.

एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये कोरे पृथ्वीराज रामचंद्र ( जनरल-19), आलदर ज्ञानेश्वरी समाधान ( जनरल-72), लोहार नेहा प्रशांत ( जनरल-191), मदने श्रावणी ब्रह्मदेव (NTC-7), मदने आदित्य शिवाजी (NTC-11),व्हनमाने आरोही बंडोपंत (NTC-13 ), गोडसे शिवम शंकर (OBC-82), मोरे विपुल सुदीप (SC-53), छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीमध्ये पाटील मित विश्वास या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

वरील सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सुखदेव कोळेकर , बाह्य परीक्षा विभाग प्रमुख प्रसाद आदाटे , निलेश कांबळे , शुभांगी नागरसे , विद्या जाधव, गुरुदेव उजनीकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत शाळेमार्फत गुलाब पुष्प, मानाचा फेटा व पेढा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण महर्षी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे ,पर्यवेक्षक चारुदत्त जगताप व सर्व पालकांच्या उपस्थितीत पालक बंडोपंत व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थी मनोगतामध्ये पृथ्वीराज कोरे, ज्ञानेश्वरी आलदर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कष्ट आणि संस्थेने व शाळेने केलेले योग्य नियोजन यामुळेच आम्हाला हे यश प्राप्त झाले.व दिवसेंदिवस कोळा विद्यामंदिरची होत असलेली शैक्षणिक प्रगती याबद्दल समाधान व्यक्त केले.

पालकांनी उत्स्फूर्तपणे मार्गदर्शक शिक्षक व प्रशासकीय स्टाफ यांचा गुलाब पुष्प व व मानाचा तुरेबाज फेटा बांधून सत्कार केला. पालकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास केला व शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन केले व संस्थेने व शाळेने योग्य नियोजन करून अंमलबजावणी केली त्यामुळेच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले असे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य श्रीकांत लांडगे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष प्रा.पी.सी झपके, संस्था सचिव म. शं.घोंगडे , खजिनदार शं. बा. सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य श्रीकांत लांडगे, पर्यवेक्षक चारुदत्त जगताप, संस्था बाह्य परीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे व प्रशाला बाह्य परीक्षा विभाग प्रमुख प्रसाद आदाटे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोळा ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन व कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कांबळे व मारुती सरगर यांनी केले. आभार शुभांगी नागरसे यांनी मानले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

Solapur | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

Next Post

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.