Monday, June 23, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार

MH 13 News by MH 13 News
1 July 2024
in महाराष्ट्र
0
सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ

सांगली :  सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्र सामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील.  या आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मिरज येथे बोलताना केले.

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या नवीन एमआरआय मशीनचे लोकार्पण व नूतनीकरण केलेल्या सीएसएसडी विभागाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या  प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे व प्रियांका राठी यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स व विद्यार्थी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खाजगी रुग्णालयात ज्या प्रमाणे आधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध आहे, त्याच प्रमाणे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्र सामग्री व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाला प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत शासकीय रुग्णालयांना अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय सेवांसाठी मिरज शहराचा मोठा लौकिक आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून आरोग्य सेवांसाठी अधिकचा निधी दिला ही बाब कौतुकास्पद आहे. या निधीमुळेच नवीन एमआयआर  मशीन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले. सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयास लागणाऱ्या आवश्यक यंत्र सामग्रीसाठी व आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील  मुला-मुलींच्या वस्तीगृहाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवावा. या दुरुस्तीच्या कामास मान्यता व निधी दिला जाईल. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग विभाग सुरू करण्याबाबत मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन येथून बाहेर जाणाऱ्या भावी डॉक्टरांनी समाजातील गोर गरीब रुग्णांची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.

सांगली मिरज शहरे आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जातात. सामान्य माणसाला दर्जेदार व कमी खर्चात आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने नेहमी प्राधान्य दिले असून सांगली, मिरज मधील शासकीय रुग्णालयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन दिल्या जातील, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ते म्हणाले मिरज महाविद्यालयाच्या रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५ कोटीचे एमआरआय मशीन उपलब्ध झाल्याने  या भागातील रुग्णांच्या उपचारासाठी याची मोठी मदत होईल. कमी खर्चात अचूक निदान झाल्याने पुढील उपचारासाठी त्याचा लाभ होईल. तसेच सी.एस.एस.डी विभागामुळे दान केलेले अवयव आणि वैद्यकीय साधन सामग्रीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होईल.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, कोरोना काळात मिरज रुग्णालयाने चांगले काम केले आहे. या ठिकाणी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज येथील शासकीय रुग्णालयांमधील आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जाईल.

अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.  कोरोना काळात रुग्णालयाने चांगले काम केले आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन सुविधा निर्माण होत असल्याने याचा सामान्य रुग्णांना लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांचा सेवा निवृत्तीनिमित्त मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचे स्वागत करण्यात आले.

Previous Post

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल

Next Post

कर्नाटक विधानपरिषदेच्या विनंती अर्ज आणि सभागृह समितीची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत २ जुलै रोजी अभ्यास भेट

Related Posts

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन
महाराष्ट्र

पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन

14 June 2025
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट
धार्मिक

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट

14 June 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा

14 June 2025
Next Post
कर्नाटक विधानपरिषदेच्या विनंती अर्ज आणि सभागृह समितीची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत २ जुलै रोजी अभ्यास भेट

कर्नाटक विधानपरिषदेच्या विनंती अर्ज आणि सभागृह समितीची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत २ जुलै रोजी अभ्यास भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.