Wednesday, August 27, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटीबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

MH13 News by MH13 News
8 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटीबद्ध             – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
0
SHARES
56
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी शासन कटीबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

कोणत्याही सहकारी संस्थानी यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता, स्वच्छता व शिस्तबद्धता या तीन गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक बँकेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ संपन्न, स्मरणिकेचेही प्रकाशन

सहकार क्षेत्रातील कर्ज वसुली प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा

सर्व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

सोलापूर येथे आयोजित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समारंभाचे स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे, बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे, बँकेचे सर व्यवस्थापक रामलाल शर्मा, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचा विकास ग्रामीण भागात रुजलेल्या सहकार चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. देशातील अन्य राज्याचा विचार केला तर त्या राज्यामध्ये सहकार चळवळ व्यवस्थितपणे रुजलेली नाही, त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात आवश्यक तेवढा विकास न झाल्यामुळे त्या राज्यातील नागरिक रोजगारासाठी महाराष्ट्र राज्यासह अन्य विकसित राज्यात स्थलांतर करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना अधिक बळ देण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी चळवळीचे महत्त्व जाणून केंद्रीय सहकार विभागाने संपूर्ण देशभरात पुढील पाच वर्षात दहा हजार पेक्षा अधिक सहकारी संस्था स्थापित करण्याचे धोरण ठरवलेले आहे.

राज्याचे सहकार विभाग ही सहकारी संस्थांमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारी संस्थांच्या उन्नतीला चालना देण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावणार आहे. सहकारी संस्थांनी आपली विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी आरबीआय ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून कोणतीही सहकारी संस्था यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता, स्वच्छता व शिस्तबद्धता या तीन गुणांचा अंगीकार करावा, असे आवाहनही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुचित केले.

सोलापूर जिल्ह्यातील 32 नागरी सहकारी बँकापैकी 27 बँकांची परिस्थिती चांगली असून ही बाब सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ व्यवस्थितपणे सुरू असल्याचे श्री पाटील यांनी सांगून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभास शुभेच्छा देऊन या बँकेसह सर्व सहकारी बँकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी देशभरात जवळपास चौदाशे सहकारी बँका असून त्यातील एक तृतीयांश बँका महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत असे सांगून सहकार चळवळीला भाग भांडवल निर्माण करण्याचा मोठा प्रश्न असल्याचे सांगून सहकार कायद्यात बदल करून बँकांना भांडवल निर्मिती करण्यासाठी शासनाने विचार करावा.

टेक्नॉलॉजी फंड निर्माण करून शासनाने सहकारी संस्थांना वित्तीय सहाय्य उपलब्ध करून द्यावे त्याप्रमाणेच कर्ज वसुली प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी व देवेंद्र कोठे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभ निमित्त बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

प्रारंभी समारंभाचे स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली तर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी बँकेने 1974 पासून आज रोजी पर्यंत केलेल्या व राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर यांच्या हस्ते सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार बँकेच्या संचालक मंडळाकडून मानण्यात आले.

Tags: solapurSolapur Maharashtraबाबासाहेब पाटीलसहकार मंत्रीसिद्धेश्वर सहकारी बँकस्वर्ण महोत्सवी वर्ष
Previous Post

पक्षाचा कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू..! – बाबासाहेब पाटील,सहकार मंत्री

Next Post

राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी पुनश्च डॉ. गजानन कोटेवार

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी पुनश्च डॉ. गजानन कोटेवार

राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी पुनश्च डॉ. गजानन कोटेवार

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.