Tuesday, April 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

 लोकसभा निवडणूक २०२४

MH13 NEWS NETWORK

मुंबई, दि. २४ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी स्वीप (SVEEP) अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नुकतेच भायखळा विधानसभा मतदार संघात दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांसाठी आयोजित शिबिरात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील शाळांमधील सुमारे ७०० शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले. प्रशिक्षणार्थींनी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सूक्ष्म नियोजन कसे करावे, मतदारांना मतदानासाठी प्रेरित कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भायखळा विधानसभा मतदार संघात आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण शिबिरात ३३ क्षेत्रीय अधिकारी, २५५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ३५ बचत गट कर्मचारी, १५७ अंगणवाडी सेविका, ६७ आरोग्य सेविका, १०५ कार्यालयीन कर्मचारी असे एकूण सुमारे ६५२ कर्मचारी सहभागी झाले. या शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदाता दूत जसे अंगणवाडी सेविका/मदतनीस, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, स्वच्छता कर्मचारी यांना आवश्यक नेतृत्व कौशल्य, मुंबई शहर जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशिक्षित व प्रेरित करण्यात आले. प्रत्येक प्रशिक्षणार्थींने समूह भावना व लक्ष्यपूर्वक दृष्टिकोनातून २०० कुटुंबांतील मतदारांना कसे जोडावे आणि त्यांना मतदानासाठी कसे प्रेरित करावे, याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे, त्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्त्व मतदारांना पटवून देण्याविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भातील संकल्पपत्र भरून घेणेबाबतही माहिती देण्यात आली.

या दोन्ही प्रशिक्षण शिबिरात मुंबई शहर जिल्हा स्वीप समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भायखळा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  प्रतिभा वराळे, निवडणूक अधिकारी राजेश कंकाळ, उपनिवडणूक अधिकारी निसार खान आदी उपस्थित होते.

Previous Post

कोठे भाजपमध्ये..! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट

Next Post

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल

Related Posts

आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.