MH 13 NEWS NETWORK
सोलापूर
दक्षिण तालुक्यात महायुती शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. गेल्या दहा वर्षांत होटगीसाठी सर्वोच्च निधी आपण दिला आहे. होटगी गाव हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी संधी द्यावी, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होटगी, आहेरवाडी येथे बैठक घेतली आणि पदयात्रा काढत आ. देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी आ. देशमुख यांचे ढोल, ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, रामप्पा चिवडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. देशमुख म्हणाले, गेल्या 25 वर्षात जेवढा निधी तालुक्याला आला नाही तेवढा निधी आपण 10 वर्षात आणला आहे. तालुक्यातील रस्ते मजबूत आणि दर्जेदार झाले आहेत. 2014 मध्ये तुम्ही बदल केला त्यामुळे तालुक्याच्या विकासात ही बदल झाला आहे. मला दक्षिण तालुका राज्यात टॉपला आणयचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी. तालुक्याची एकदम प्रामाणिकपणे सेवा करणार आहे. यावेळी खा. इरण्णा कडाडी यांनी येत्या 20 तारखेला कमळ चिन्हसमोरील बटन दाबून प्रचंड आ. देशमुख यांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी जगन्नाथ गायकवाड,राघवेंद्र बिराजदार, लक्ष्मीताई गायकवाड, अंबिका पाटील,जगन्नाथ गायकवाड, अतुल गायकवाड, चंद्रकांत कुटाने, शिवानंद हुरे,राजू भालकर, मल्लिकार्जुन सोनकडे, इलाही शेख,वसीम गिरगावकर,विशाल गायकवाड, सचिन जाधव,आमसिद्ध पूजारी,मल्लिकार्जुन कोनदे, मल्लू चिवडशेट्टी, परशुराम अटकर व ग्रामस्थ उपस्थित होते.