mh 13 news network
राष्ट्रवादी महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम तसेच डॉक्टर विभाग अध्यक्ष महेश वसगडेकर यांचा संयुक्त उपक्रम….
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार , प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून स्वराज्य सप्ताह साजरा होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर महिला निरीक्षका दिपालीताई पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर शील विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष महेश वसगडेकर यांनी शिवजयंती आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी समाजामधील कर्तृत्ववान समाज सेवकांचा शाल , फेटा ,श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे यांच्या शुभहस्ते तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या ईतर सर्वच प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आला . यानंतर समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान समाज सेवकांचा शाल , फेटा ,श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
पुरस्कार विजेते सत्कारमूर्ती ची नावे खालील प्रमाणे 👆🏻👇👇👇👇👇
अनिता गवळी
विजया नागनाथ स्वामी
सुरेखा पडसलगी
संगीता देशपांडे
स्मिता पाठक
शशिकला कस्पटे
पांडुरंग वाघमारे
वैभव जवळकोटे
लक्ष्मी आठवले
त्याचसोबत महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता या स्पर्धेत स्मिता पाठक यांनी प्रथम लक्ष्मी आठवले त्यांनी द्वितीय तर विजया स्वामी यांनी तृतीय क्रमांक पटकावला…
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकास पैठणी द्वितिय विजेत्या स्पर्धकास सेमी पैठणी व सहभागी स्पर्धकास वस्तू रुपात सप्रेम भेट देण्यात आली …
याचसोबत सोलापूर ते रायगड सायकलवर प्रवास करून आजच्या पिढी समोर वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या धैर्य गोरे याचा ही विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला….
प्रस्ताविकेत महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी त्यांच्या भाषणात रूपालीताई चाकणकर व दिपालीताई पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर महिला आघाडी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व समाजसेवकांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ,प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांनी पुरस्कार त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
या प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महेश निकंबे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे,सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, राजश्री कांबळे,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉक्टर विक्रम बसरगी , डॉक्टर बबन कांबळे , पत्रकार संतोष कासे, अमर साळुंखे , अशोक साळुंखे, सुनीता जाधव , डॉक्टर प्रीतम कांबळे , डॉक्टर प्रशांत राठोड, रितेश कांबळे , भीमा रसाळकर, विजय वाघमारे , कल्पना पांढरे , महिला आघाडी सुरेखा घाडगे , शोभा गायकवाड , जाधव , सरोजिनी जाधव, यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…..