MH 13 News Network
महिलांच्या न्याय व हक्कासाठी ही निवडणूक मी लढतेय -ॲड.मीनल साठे
उसाचे ज्यादा दर सांगून विरोधकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक..!
रोपळे येथील जाहीर सभेत प्रतिपादन….
रोपळे /प्रतिनिधी :माढा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड.मीनल साठे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील रोपळे, नारायण चिंचोली, ईश्वर वाठार या ठिकाणी प्रचार सभा प्रचार रॅली, संपन्न झाली.

रोपळे येथील जाहीर सभेत बोलताना मीनल साठे यांनी सांगितले की या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण म्हणून मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे मनापासून आभारी आहे.

या तालुक्यात उसाच्या भावावरून राजकारण केले जाते परंतु आमदार शिंदे यांनी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची उसाच्या नावावर गेल्या 30 वर्षापासून मिरवणूक केलेले आहे. उसाचा भाव फुगून सांगितला जातो परंतु कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात मिळणारा शेतकऱ्याला भाव व कारखाना बंद होताना मिळणारा भाव यामध्ये भावात फरक असतो परंतु अंतिम भाव हा दर म्हणून विरोधकांकडून सांगितला जातो.

अभिजीत पाटील यांनी महायुती सरकारने त्यांना कारखान्यासाठी शेकडो कोटी रुपयांची मदत केली असून त्या पैशावर कारखान्याचे कर्ज न फेडता ही निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत व शेतकऱ्याची दिशाभूल करत आहेत.
या निवडणुकीच्या निमित्ताने मी विकासाचे व्हिजन या नावाखाली माढा तालुक्याचा जाहीरनामा प्रकाशित केला असून या जाहीरनाम्याच्या माध्यमातून महिलांना लघु उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणे. महिलांची सुरक्षितता वाढविणे व महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणे व महिलांचा सर्वांगीण विकास करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असून या मतदारसंघातील पायाभूत सुविधा सोडवण्यावर प्राधान्य असणार आहे.