सोलापूर : खून प्रकरणात निर्दोष सुटलेल्या आरोपीने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात व मूळ फिर्यादीविरोधात दाखल केलेला खटला जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून, याप्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल कायम ठेवण्यात आला आहे.
सदर प्रकरणात आरोपीने आपल्याविरोधात खोटे आरोप केल्याने बदनामी, मानसिक त्रास आणि नावलौकिकाचे नुकसान झाल्याचा दावा करत, भारतीय दंड विधानातील कलम 182 (खोटी माहिती देणे), 211 (खोटा खटला दाखल करणे), 427 (मालमत्तेचे नुकसान), 499 व 500 (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत न्यायालयात खटला दाखल केला होता.
मात्र, सदर खटला प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती मनोज शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
सत्र न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की, खून प्रकरणात आरोपीला निर्दोष सोडताना न्यायालयाने त्याच्याविरोधात खोटेपणाने गुंतवण्यात आल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांवर खटला दाखल करता येणार नाही, असा स्पष्ट निकाल न्यायालयाने दिला.
या प्रकरणात पोलिस अधिकारी आणि फिर्यादीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने व ॲड. प्रणित जाधव यांनी काम पाहिले.
#खूनप्रकरण #सत्रन्यायालय #IPC #BadnamiKhotaKhutla #SolapurCourtJaydeep Mane Adv Vikas Mote @