Friday, June 27, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तब्बल 870 कोटींचे कर्ज ; मराठा उद्योजकांना व्याज परताव्याचा मोठा आधार – नरेंद्र पाटील

MH13 News by MH13 News
21 September 2024
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
333
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व लोकमंगल बँकेचा उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न


सोलापूर प्रतिनिधी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून सोलापूर जिल्ह्यामध्ये १०१०६ लाभार्थ्यांना ८७० कोटीचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जापोटी आज पर्यंत ८० कोटीचा व्याज परतावा देण्यात आला आहे. उद्योजक एखादा उद्योग उभारत असताना कर्जापेक्षा व्याजाच्या पैशानेच  हैराण होतो. मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याजाचा परतावा भरला जात असल्यामुळे उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याचे मत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.


लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने एक लाख उद्योजक स्वप्नपूर्ती अंतर्गत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्याला मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील हे बोलत होते.


यावेळी आमदार सुभाष देशमुख, सुधाकर इंगळे महाराज लक्ष्मण महाराज चव्हाण, दास शेळके ,अमोल शिंदे ,सुनील रसाळे, श्रीकांत डांगे ,दिलीप कोल्हे, तात्या वाघमोडे सोमनाथ राऊत, खंडू राऊत, राम जाधव ,अनंत जाधव व लोकमंगल बँक अधिकारी कर्मचारी आणि मराठा उद्योजक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की मी इथं मार्गदर्शन करण्यासाठी नव्हे तर इथे जमलेल्या मराठा उद्योजकांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे आतापर्यंत आपण 1260 उद्योजकांना कर्ज पुरवठा केला आहे भविष्यात हजार नव्हे तर दहा हजार उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याची उद्दिष्ट असून सोलापूर जिल्हा हा समृद्ध करण्यासाठी आपला प्रयत्न आहे एका उद्योजकाने किमान दहा उद्योजक निर्माण करून गावच्या गाव समृद्ध करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


यावेळी यशस्वी उद्योजकांचा सत्कार ही करण्यात आला काही उद्योजकांना 15 लाख रुपये कर्जाच्या वाटपाचे चेकही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी धर्मराज चटके, अर्चना करंजे या उद्योजकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे आपण उद्योजक झाल्याचे मनोगत व्यक्त केले.

श्रीकांत डांगे, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, सुधाकर इंगळे महाराज लक्ष्मण चव्हाण महाराज,अनंत जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केली तर उपस्थितांचे आभार आनंत जाधव यांनी मानले.

माझ्या लेव्हलच्या माणसाने टॅटूवर टीका करावी.


माझ्या हातावर जो टॅटू गोंदवला गेलेला आहे, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही.  कोणीही त्या विषयावरती बोलू नये . बोलणारानी आपली लेव्हल समजून घ्यावी, आणि मगच बोलावे असा टोला नरेंद्र पाटील यांनी नाव न घेता लगावला.

मराठा तरुण उद्योगात पुढे यावा.


मराठा तरुण हा नको त्या ठिकाणी पुढे पुढे येतो मात्र असं न होता मराठा तरुण हा उद्योगांमध्ये पुढे यावा नोकरीचा अट्टाहास न करता नोकरी देण्याचा अट्टाहास त्यांनी धरावा .
अमोल शिंदे.
उद्धव ठाकरे कडे पारख नाही
उद्धव ठाकरे यांच्याकडे नेता कार्यकर्ता पारखण्याची पारक नाही. त्यामुळे अनेक जण त्याला सोडून गेले आणि कार्यकर्त्यांना हिम्मत देण्याची भूमिकाही नसल्यामुळे त्यांच्या काळात अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. ठाकरे यांचे मराठा समाजाबद्दल दाखवायची दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे असल्याची टीकाही नरेंद्र पाटील यांनी केली.

लाडक्या बहिणी पेक्षाही ही योजना चांगली.
राज्यामध्ये सध्या लाडक्या बहीण योजनेची चलती आहे. वास्तविक पाहता लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८००० रुपये मिळतात.  लाडक्या भावाने जर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये पंधरा लाखाचं कर्ज घेतलं तर त्याला साडेचार लाख रुपये व्याज परतावा मिळतो. त्यामुळे लाडक्या बहिणी पेक्षा ही लाडक्या भावाची योजना चांगली असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

Tags: annasaheb patil mahamandalnarendra patil
Previous Post

हिंदू- मुस्लिम बांधवांची ‘ सोनाई ‘; कव्वालीतून साधला ‘युवराज’ने भाईचारा

Next Post

न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी”

Related Posts

Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!
शैक्षणिक

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

26 June 2025
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!
आरोग्य

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

25 June 2025
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड
सामाजिक

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

25 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!
धार्मिक

श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!

24 June 2025
Next Post
न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी”

न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी”

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.