MH13 NEWS NETWORK
सोलापूर : वालचंद शिक्षण समूहातील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे ७६ वा ‘प्रजासत्ताक दिन’ तथा ‘गणराज्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.’भारतीय संविधान’ ची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. सध्याचे ‘अमृत महोत्सव’ वर्ष असल्याने प्रशालेमध्ये विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. प्रशालेमध्ये ‘संविधान जागर’ हा नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांना संविधान काय आहे?, संविधान कशी हाताळावी?, संविधानात आपले अधिकार कोणते आहेत?, नागरिकांचे हक्क कोणते आहेत?, आपली जबाबदारी काय आहे? व तसेच , संविधानाची उद्देशिका’ कशी आहे व त्याचा अर्थ काय आहे या सर्व घटकांची जाणीव व याबद्दल सविस्तर माहिती होण्यासाठी ‘हर कक्षा संविधान’ या उपक्रमांतर्गत संविधानाची प्रत प्रत्येक वर्गात उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक वर्गाचे वर्गप्रतिनिधी व वर्गशिक्षक यांना ही प्रत देण्यात आली.
शालेय जीवनामध्ये याची जाणीव व्हायला पाहिजे हा त्यामागील उद्देश असल्याचे मत प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री राजकुमार काळे यांनी मांडले. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे, तांत्रिक विभाग प्रमुख राजेश मोहोळकर, किमान कौशल्य विभाग प्रमुख प्रदिप माळी, जेष्ठ शिक्षक श्रीरंग माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व सर्व विश्वस्त यांनी या स्तुत्य नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खोबरे व तृप्ती दुर्गे यांनी केले.