Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई  : राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पाणी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. यामुळे ‘हर घर नलसे जल’ या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी राज्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले.

मंत्रालयातील दालनात राज्यातील जलजीवन मिशनबाबत आढावा बैठकीत मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन, सहसंचालक श्रीकांत अनारसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ,आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील ग्रामीण जनतेला पाणीटंचाई भासू नये, यासाठी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत जलजीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील  1 कोटी 46 लाख 71 हजार 918 कुटुंबापैकी 1 कोटी 25 लाख 98 हजार 195 कुटुंबांना नळ जोडणी देऊन  पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शाळा, अंगणवाड्यांनाही 99 टक्के नळजोडणी देण्यात आली आहे. जलजीवन मिशनचे सुधारित प्रस्ताव त्वरित पाठविण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या. शिवाय राज्यभरातून सुधारित प्रस्तावासाठी आणि कामे मिशन मोडवर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागांतर्गत शिबीरे आयोजित करावीत.

अमरावती, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात जिथे निधीची कमतरता आहे, तिथे त्वरित निधी वितरित करावा. जिल्हा परिषदस्तरावर कामे वेगाने होण्यासाठी गट स्थापन करावेत. येत्या एक महिन्यामध्ये योजनेला गती देण्याचे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी ज्या जिल्ह्यांची निधीची मागणी आहे, त्यांना निधी देण्यात येणार असून महिन्याभरात कामांना सुरळितपणा आणण्याची ग्वाही प्रधान सचिव श्री. खंदारे यांनी दिली.

राज्यात यावर्षी आतापर्यंत 1 लाख 5206 नळजोडणी केली तर 17221 गावे हर घर जल म्हणून घोषित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Previous Post

शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सुविधा निर्माण करा – मंत्री अब्दुल सत्तार

Next Post

पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.