Sunday, March 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘लुब्रिझोल’च्या बिडकीन येथील प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मिती

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
‘लुब्रिझोल’च्या बिडकीन येथील प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मिती
0
SHARES
13
VIEWS
ShareShareShare

– उद्योगमंत्री उदय सामंत 

MH 13 NEWS NETWORK

मुंबई, दि. ३० : लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगणासाठीच्या मिश्रीत प्रणाली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीद्वारे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच ९०० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

उद्योग विभाग आणि लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आज मंत्री श्री.सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि लुब्रिझोल इंडिया मीडल ईस्ट आणि आफ्रिकेच्या व्यवस्थापकीय संचालक भावना बिंद्रा यांनी करारावर स्वाक्षरी केली. एमआयटीएल (ऑरिक) चे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, लुब्रिझोल अ‍ॅडिटीव्हचे अध्यक्ष फ्लाविओ क्लिगर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते बिडकीन परिसरातील 120 एकर जागेचे वाटप पत्र लुब्रिझोल कंपनीस सुपूर्द करण्यात आले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, लुब्रिझोल समूहाने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत आपली गुंतवणूक वाढवण्याची आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीस हातभार लागेल. त्याचबरोबर रोजगार देखील निर्माण होतील. उद्योग विभाग कंपनीला पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ऑरिक बिडकीन येथे नवीन सिंथेटिक ऑर्गेनिक रासायनिक उत्पादन सुविधा स्थापन करणार आहे. कंपनी दोन टप्प्यांमध्ये सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे पुढील काही वर्षांत सुमारे 900 व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल. प्रस्तावित गुंतवणुकीअंतर्गत ऑरिक बिडकीन येथे 120 एकर जागेत आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प स्थापन केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लुब्रिझोलचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा, तर जगातील दुसरा सर्वात मोठा प्रकल्प असेल अशी माहिती लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भावना बिंद्रा यांनी यावेळी दिली

Previous Post

रांजणगावला घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना सुरु

Next Post

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ द्यावा

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ द्यावा

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ द्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.