MH 13 News Network
–
-पत्रकार हा समाजातील विविध प्रश्न मांडतो–
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण
सोलापूर : पत्रकार हा समाजातील विविध प्रश्न मांडतो. पत्रकार हे रात्री उशिरापर्यंत कार्यरत असतात. वातावरणातला बदल आणि प्रदूषण वाढले आहे. धकाधकीच्या आयुष्यात पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्य हे अति महत्त्वाचे आहे. आरोग्य जपले तरच समाजाचे प्रश्न पत्रकार मांडू शकतो. त्यामुळे पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन मनगोळी हाँस्पिटलचे डॉ.अरूण मनगोळी यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा समाजकल्याण केंद्र, रंगभवन चौक येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर बिल्डर असोसिएशनचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष संतोष कलकुटगी, दमाणी विद्या मंदिरचे संचालक नयनकुमार नोगजा, नट्स मिठाईचे प्रमुख भावेश शहा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे , संस्थापक महेश कासट आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक वृतपत्र व वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे.
सुत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुर गवते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे, गणेश येळमेली, सचिन लोणी, श्रीपाद सुत्रावे, अभिजीत व्हानकळस, दिपक करकी, राजेश केकडे, साहेबराव परबत, रेवण कोळी, महेश ढेंगले, तुकाराम चाबुकस्वार, शिवराज नगरकर, शिवानंद नागणसुरे, अक्षता कासट, संगिता बच्चल, मनुश्री कासट, शिला तापडिया, शुभांगी लचके, सुजाता संक्करगी, तुप्ती पुजारी, ज्योती गायकवाड, संगीता नागणसुरे आदींनी परिश्रम घेतले.
– हे आहेत पुरस्काराचे मानकरी विशेष गौरव पुरस्कार संजय पाठक (दै.पुढारी) तर आदर्श पत्रकार पुरस्कार – श्रीनिवास दासरी (दै.दिव्यमराठी), पद्माकर कुलकर्णी (आकाशवाणी केंद्र), रणजीत जोशी (दै.एकमत), अविनाश गायकवाड (दै.तरूणभारत), रूपेश हेळवे (दै.लोकमत), आफताब शेख (एबीपी माझा), राजकुमार माने (दै.संचार), गणेश कांबळे (दै.सकाळ) परशुराम कोकणे (स्मार्ट सोलापूरकर) आदी पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.