mh 13 news network
परभणी, म.प्रा.म.वि., गोंडवाना, नाशिक, पुणे, शिवाजी विद्यापीठाचे दमदार विजय

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठ शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा सोलापुरात सुरू झाली असून तिसऱ्या दिवशी साखळी फेरीचे 6 सामने पार पडले व त्यात सकाळच्या सत्रात गडचिरोली च्या गोंडवाना, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठाने आणि पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ तर दुपारच्या सत्रात परभणी, MUHS नाशिक आणि महाराष्ट्र ॲनिमल फिशरी सायन्स विद्यापीठांनी दमदार विजय मिळवले असून MUHS नाशिक, VNMKV परभणी या विद्यापीठ संघांनी सलग दोन विजय प्राप्त केले आहेत.
तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संघातील खेळाडू मनीष गायकवाड याने तडफदार नाबाद शतक झळकावत अष्टपैलू कामगिरी करताना 3 बळी देखील मिळवत 1 अप्रतिम झेल घेतला. तसेच अजय गावंडे, प्रवीण पाहाणते, रुपेश मेश्राम यांनी अर्धशतके लगावली.
या स्पर्धेत एकूण 17 संघांनी सहभाग नोंदविला असून त्यांची विभागणी 4 गटात केली असून प्रथम साखळी पद्धतीने टी20 पद्धतीत लेदर चेंडूवर रंगीत पोशाखात अतिशय सुंदर नेटके नियोजन अंतर्गत सामने पार पडत आहेत. चारही मैदानावर सोलापूरच्या विद्यापीठाचे कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक हे समन्वयाची भूमिका पार पाडत असून जिल्हा क्रिकेट पंच संघटनेचे सर्वोतोपरी सहकार्य मिळत आहे.
पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर व प्र.कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्र.कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ.अतुल लकडे यांच्या मुख्य नियोजनात सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल रेल्वे मैदान, भंडारी स्पोर्ट्स क्लब व दयानंद कॉलेज या ठिकाणी रोज 2 सामने होत असून तिसऱ्या दिवशी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आज सिनेट सदस्य चन्मवीर बंकुर यांचे हस्ते सामनावीराचा पुरस्कार प्रवीण पाहाणते याला, रेल्वे मैदानावर सोशल महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा सिनेट सदस्य जैनुद्दीन मुल्ला, प्राध्यापिका नीता मंकनी यांचे हस्ते मनीष गायकवाड व माणिक ढगे यांना सामनावीराचे पुरस्कार देण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :
*1) इंदिरा गांधी पार्क स्टेडियम*
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली : 185/4 (18)
प्रवीण पाहाणते नाबाद 57, सतीश एस. 37, अनिल चव्हाण 29, अवांतर 22 धावा
राजीवरंजन मिश्रा 26/2, मंगेश आटे व रुपेश मेश्राम प्रत्येकी 1 बळी.
विजयी विरुद्ध
KKSU रामटेक : 122/1 (18)
रुपेश मेश्राम नाबाद 53, विजयेंद्र पांडे नाबाद 30, दीपक जोंधळे 21, अवांतर धावा 18
भीमराव उराडे 1 बळी.
MUHS नाशिक : 147/6 (20)
नंदकिशोर ठाकरे 45, संदीप चौधरी 31, सचिन शिराळ 27, अवांतर 23 धावा
ज्ञानेश्वर भोई 33/2, सुनील थोरात व महादेव वालेकर प्रत्येकी 1 बळी
विजयी विरुद्ध
पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ : सर्वबाद 121 (19.3)
हनुमंत लोखंडे 34, मुख्तार शेख 25, सुनील थोरात 19
संदीप चौधरी, पुष्कर तऱ्हाळ, योगेश राऊत, महेंद्रनाथ चौधरी, संतोष जाधळ प्रत्येकी 2 बळी
*2) रेल्वे मैदान*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : 169/5 (20)
मनीष गायकवाड नाबाद 108, दीपक गजरमल 27, नितीन प्रसाद 14
सिद्धेश चव्हाण 33/2, सिद्धेश चव्हाण 39/2 बळी
विजयी विरुद्ध
मुंबई विद्यापीठ :
विपुल खंदारे 33, अवांतर धावा 12
मनीष गायकवाड 15/3, अक्षय वाल्मिकी 28/3, बसवंत गजलवार संतोष सुगावे प्रत्येकी 1 बळी
डॉ.BATU लोणेरे : सर्व बाद 110 (20)
दिशांत शिंदे 35, ओंकार बोधिळकर 23, नितेश पाटील 18, आदेश सोनार 14 धावा
जमीर शेख 16/3, माणिक ढगे 20/2, मारोती शेल्हाळे 22/2 व मुजीब शेख, मनोज कऱ्हाळे प्रत्येकी 1 बळी
पराभूत विरुद्ध
VNMKV परभणी : 112/7 (16.3)
धीरज पाथरीकर 41, संतोष यादव नाबाद 31, माणिक ढगे 13 धावा.
जितू अंधेरे 18/3, रोहित गमरे 22/2, नितेश पाटील व अल्पेश कोरपे प्रत्येकी 1 बळी
*3) दयानंद कॉलेज मैदान*
KBCNMU जळगाव : 119/6 (20)
रश्मिकांत जाधव 25, चंदन मोरे 20, अरुण सपकाळे 18, स्नेहल कुवर 17
राजू मुपडे 20/2, अनिल पाटील व विनायक शिंदे प्रत्येकी 1 बळी
पराभूत विरुद्ध
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर : 123/5 (16.4)
हरी मस्के नाबाद 23, युवराज साबळे विनायक शिंदे प्रत्येकी 21, अभिजीत कोठावळे 18, अवांतर 15 धावा
जितेंद्र पाटील, किशोर पवार, सुभाष पवार, अरुण सपकाळे प्रत्येकी 1 बळी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक : 148/8 (20)
निखिल शिंदे 39, संदीप भागवत 26, योगेश जाधव 31, अवांतर धावा 24
विठ्ठल धायगुडे 24/3, अतुल ढोक 31/2 बळी
पराभूत विरुद्ध
महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स विद्यापीठ : 149/9 (18)
अजय गावंडे नाबाद 82, अविनाश जाधव 15, अवांतर धावा 18.
निखिल शिंदे व दिगंबर गाडे प्रत्येकी 2 तर संदीप भागवत लक्ष्मण शेंडे प्रत्येकी 1 बळी.
या सर्व सामन्यासाठी मझहर मंगोली, महेश सोनवणे, इरशाद बिराजदार, दया नवले, सुहेल शेख, चिराग शहा, चंदू मंजेली यांनी पंच म्हणून तर गुणलेखक म्हणून मिलिंद गोरे, प्रसाद शावंतुल यांनी काम पाहिले.
सोबत फोटो : रेल्वे मैदानावर मनीष गायकवाड, माणिक ढगे यांना सामनावीर पुरस्कार देताना सीनेट सदस्य प्रा.जैनोद्दीन मुल्ला व सौ.नीता मंकणी व इतर मान्यवर








